Vikhroli Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Vikhroli Crime News: भररस्त्यात तरुणीची छेड काढून आरोपी फरार; संतप्त नागरिकांचा पोलीस स्टेशनला घेराव घालत आंदोलन

Crime News: झालेल्या घटनेमुळे नागरिकांनी आक्रमक भूमीका घेतलीये.

साम टिव्ही ब्युरो

Vikhroli News:

विक्रोळीमध्ये काल एका मिरवणुकीदरम्यान संतापजनक घटना घडली. काही मुलांनी तेथून जात असलेल्या तरुणीची छेड काढली. सदर घटनेमुळे नागरिकांनी निषेध व्यक्त करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात गोंधळ निर्माण झालाय. (Latest Marathi News)

विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस स्टेशनला नागरिकांनी घेराव घातला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. झालेल्या घटनेमुळे नागरिकांनी आक्रमक भूमीका घेतलीये. शांततेत काही ऐकण्यास नागरिक तयार नसून, आरोपीस अटक करण्यात यावी ही मागणी केली जातेय.

भररस्त्यात तरुणीची छेड काढल्यावर मुलगी आणि तरुणात झालेल्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी आपल्या तपास कार्यात आनखी वेग देखील वाढवला आहे.

पार्क साईट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांनी याबाबत म्हटलं की, "आमच्या सहा टीम आरोपीचा शोध घेत आहेत. शोध कार्यात महिला पोलीस कर्मचारी देखील आहेत. लोकांनी शांत राहावे, आमचे काम सुरु आहे." असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

खासदार मनोज कोटक यांनी या घटनेवर आपलं मत व्यक्त करत म्हटलं की, "घडलेली घटना दुर्दैवी आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रॅलीच्या आयोजकांनी देखील आता पुढे येऊन पोलिसांची मदत करून आरोपीला पकडण्यात मदत करावी." असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : 'आम्हीच इथले भाई' म्हणत पुण्यात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, पाहा Video

Happiest City: जगातील टॉप रँकिंग सर्वात आनंदी शहर कोणते? जाणून घ्या

Shivali Parab : नजरेचा नखरा अन् नथीचा तोरा, शिवाली परबचं आरस्पानी सौंदर्य

Viral Video: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर जाताय? आताच सावध व्हा, फसवणुकीचा धक्कादायक व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

SCROLL FOR NEXT