Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर मधील आदर्श पतसंस्थेने २०२ कोटीची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर आणखी एका पतसंस्थेत ३१ कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
देवाई महिला पतसंस्था असे त्या पतसंस्थेचे नाव आहे. ३१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी देवाई पतसंस्थेच्या संचालक मंडळावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असलेल्या पती, पत्नीने स्वतःच्या संस्थांना बेकायदा १३ कोटी ८३ लाख ८९ हजार १०१ रुपयांचे कर्ज देऊन आयसीआयसीआय बँकेत आठ कोटींची 'एफडी' केल्याचे ताळेबंदात दाखवून ३१ कोटी ९१ लाख १४ हजार ७५२ रुपये परस्पर हडप केल्याचे समोर आले आहे.
देवाई महिला नागरी पतसंस्थेच्या (devai mahila nagari sahkari patsanstha) अध्यक्ष मीना महादेव काकडे, कार्यकारी संचालक महादेव अच्युत काकडे, सात कर्जदार संस्था, सर्व शाखा व्यवस्थापक, कर्ज वितरण अधिकारी, कर्मचारी यांचा संशयितांमध्ये समावेश आहे. लेखा परीक्षक दत्तात्रय प्रभाकर धुमाळ यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.