MNS Andolan : नवरात्रोत्सवापूर्वी कामगारांना पगार द्या, केडीएमसीच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबत मनसे आक्रमक

जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार,मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
MNS Andolan At KDMC Office
MNS Andolan At KDMC Officesaam tv
Published On

- अभिजीत देशमुख

KDMC News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांना नियमित पगार मिळत नसल्याने मनसेने आक्रमक पवित्र घेतला आहे. महापालिकेने या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचे आश्वासन देऊन देखील अद्यापही वेतन न दिल्याने अखेर आज (मंगळवार) मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन छेडले.  (Maharashtra News)

MNS Andolan At KDMC Office
Eid E Milad 2023 : ईदनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : मुस्लिम संघटनेची मागणी

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत घन कचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना वेतन देण्यात केडीएमसी तर्फे नेहमीच विलंब करण्यात येतो. याबाबत मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी महिन्याच्या १० तारखेला या कंत्राटी कामगारांचा पगार दिले जाईल असे आश्वासन केडीएमसी तर्फे देण्यात आले होते.

MNS Andolan At KDMC Office
Kokan Politics : इतकी घाई करू नका, इच्छा असेल तर बंधूंना भाजपात पाठवा; नितेश राणेंचा उदय सामंतांना सल्ला

त्यावेळी महिन्याच्या १० तारखेला या कंत्राटी कामगारांचा पगार दिले जाईल असे आश्वासन केडीएमसी तर्फे देण्यात आले होते. मात्र गणेशोत्सव होऊन देखील कामगारांना पगार न दिल्याने मनसेच्या वतीने आज केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार,मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाचा इशारा नंतर आदल्या दिवशी रात्री कामगारांना पगार दिला असला तरी कामगारांचा गणेशोत्सव पगाराविना घालवला. मात्र आता येणाऱ्या नवरात्रोत्सवात कामगारांना आगाऊ पगार द्यावा आणि दर महिन्याच्या १० तारखेला नियमित पगार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

MNS Andolan At KDMC Office
Nitesh Rane News : पत्रकारांचे कोण पाेट भरत असेल, चहाची तहान भागवत असेल तर त्यात वाईट काय? नितेश राणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com