मुंबई/पुणे

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Mumbai's Deadly Monsoon: जगणं कठीण. मरण स्वस्त, मुंबईकरांची काहीशी अशीच परिस्थिती झालीय.रस्त्यालगतची झाडं कोसळून लोकांचे हकनाक बळी जात आहेत. त्यामुळे ढिम्मं महापालिका प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होतोय. पाहा यावरचा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • कुर्ल्यातील नौपाडा परिसरात झाड कोसळून 63 वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला.

  • चेंबूर, साकीनाका आणि कुर्ला येथील सलग घटना घडल्या.

  • गेल्या आठवडाभरात झाड कोसळून जीवितहानीची ही चौथी घटना.

रोहित कदम, साम प्रतिनिधी

मुंबईत खरंच मरण स्वस्त झालंय, होय तुम्ही बरोबर ऐकलंत.चेंबूर आणि साकीनाक्यामधील घटना ताजी असतानाच कुर्ल्यातील नौपाडा परिसरात महापालिका शाळेजवळील एका दुकानावर भलंमोठं झाड कोसळून 63 वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवडाभरातील ही चौथी दुर्घटना आहे. या वाढत्या दुर्घटनांमुळे मुंबईकरांचा वाली कोण ? असा सवाल निर्माण झालाय. बीएमसीच्या ढिसाळ कारभारावरुन संताप व्यक्त होतोय.

मुंबईत मृत्यूसत्र सुरूच

05 जुलै 2026 गोरेगाव

एम. जी. रोडवर मोठं झाड कोसळून 2 महिला गंभीर जखमी

04 जुलै 2026 आरे कॉलनी

चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू

03 जुलै 2026 सांताक्रुझ

रिलीफ रोडवर झाडं कोसळून 8 जण जखमी

01 जुलै 2026 चेंबूर

स्कूल बसवर झाडं कोसळलं, विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईतल्या दुर्घटनांवरुन ठाकरेसेनेने थेट महापौरांना लक्ष्य केलंय. तर झाडांची वेळेत छाटणी करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांचे हाल होतायत, असा आरोप करत मनसेने बीएमसीच्या कारभारावर हल्लाबोल केलाय.

खरंतर, झाडं कोसळायला ना वेगानं वारे वाहत आहेत, ना मुसळधार पाऊस कोसळतोय. तरी शहरात कुठे झाडं उन्मळून पडतंय तर कुठे झाडाच्या फांद्या कोसळून बळी जात आहेत. या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर खुद्द महापौरांनीच मोठी कबुली दिलीये. मुंबई महापालिका आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून स्वतःला मिरवते. मात्र, याच मुंबईत झाडांची वेळेवर छाटणी न झाल्यानं आणि मॅनहोल उघडी राहिल्यानं मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागतोय.

तरीही पालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राटं देणारी महानगरपालिका नक्की करते काय? निष्पापांचा जीव गेल्यानंतर तरी मुर्दाड महापालिकेला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल मुंबईकर विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT