आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी अर्थात लोकलमुळे पाच प्रवाशांचा हकनाक मृत्यू झाला आहे. दोन धावत्या लोकलमुळे १० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातात ठाणे जीआरपीचे पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
विकी बाबासाहेब मुख्यादल असे मृत जीरआरपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विकी हे ठाणे जीआरपी पोलिसांत कार्यरत होते. ते नेमक्या कोणत्या लोकलमध्ये होते, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या अपघातात पाच प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी अंदाजे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल आणि मुंबईहून कर्जतकडे येणाऱ्या लोकलच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
दरम्यान, लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाची बॅग विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलच्या संपर्कात आल्याने अचानक तोल जाऊन अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
फूटबोर्डवर उभे असलेले काही प्रवासी रेल्वे रूळावर पडले आणि त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली असून, जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवासी वर्गामध्ये तीव्र नाराजी आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.