Kandivali chawl fire  Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Mumbai: गॅस गळती होत असल्याने सिलिंडर पाण्यात ठेवला, स्फोट होऊन ३ महिलांचा मृत्यू; चौघे गंभीर

Kandivali Chawl Fire: कांदिवलीमध्ये एका केटरिंगमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये ३ महिलांचा मृत्यू झाला. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Priya More

Summary in Marathi (4 Pointers)

  • कांदिवली पूर्व मिस्त्री चाळीत सिलिंडर स्फोटामुळे ३ महिलांचा मृत्यू झाला.

  • शिवानी केटरिंग युनिटमध्ये झालेल्या या दुर्घटनेत ७ जण जखमी झाले.

  • मृत महिलांवर उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.

  • केटरिंग युनिटकडे आवश्यक अग्निशमन परवानग्या नव्हत्या, तपास सुरू आहे.

कांदिवलीमध्ये एका केटरिंग युनिटमध्ये बुधावारी अग्नितांडव झाले. गॅसचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात जण गंभीर जखमी झाले होते. यामधील तिघांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस सिलिंडरमधून गळती होत असताना देखील तसेच काम सुरु ठेवल्यामुळे ही भयंकर घटना घडली.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रक्षा जोशी ज्या ८५ ते ९० टक्के भाजल्या होत्या. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. नितू गुप्ता (३१ वर्षे) या ८० टक्के भाजल्या होत्या आणि पूनम (२८ वर्षे) या ९० टक्के भाजल्या होत्या. या दोघींवर एरोली बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या दोघींचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिघीही कॅटरिंगमध्ये काम करत होत्या.

कांदिवली पूर्व येथील मिस्त्री चाळीमध्ये असणाऱ्या शिवानी केटरिंगमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास गॅस लिकेज होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागून ७ जण जखमी झाले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली होती.

जखमींमधील सर्वांची प्रकृती गंभीर होती. जखमींमधील तिघांचा मृत्यू झाला. तर सध्या शिवानी गांधी (५१ वर्षे), जानकी गुप्ता (३९ वर्षे), मनराम कुमकट (५५ वर्षे) आणि दुर्गा गुप्ता (३० वर्षे) या सर्व जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या केटरिंगमध्ये असलेल्या एका गॅस सिलिंडरमधून बराच काळ गॅस गळती होत होती. परंतु केटरिंग युनिटच्या लोकांनी गॅस सिलिंडर उलटा करून तो पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकला आणि त्यांचे काम सुरू ठेवले आणि ही घटना घडली. चाळीत केटरिंग बिझनेस चालविण्यासाठी या केटरिंग युनिटकडे आवश्यक अग्निशमन परवानग्या नव्हत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: मंगळवार ५ राशींसाठी भाग्याचा; कामात बढतीचे योग; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Avika Gor: 'बालिका वधू'मधील लाडो लवकरच अडकणार विवाहबंधनात, अविकाच्या हातावर रंगली मेहंदी, पाहा फोटो

Maharashtra Live News Update: - सीना नदीला पुर आला अन् दिडशे लोकांची वस्ती पुर्णपणे पाण्याखाली गेली

Maharashtra HSC Exam 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! राज्य परीक्षा मंडळाकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra Politics : राजकीय उलथापालथ! एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, चंद्रकांत पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT