Mumbai Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्स रॅकेट उद्धवस्त; २.०४ कोटींचा मुद्देमाल जप्त

Mumbai Destroys Drug Network: मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धारावी, गोवंडी, मालवणी, वांद्रे आणि इतर भागात अनेक छापे टाकून २.०४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या मोठ्या कारवाईत ११ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली.
Mumbai Crime
Mumbai Police’s ANC seizes drugs worth ₹2.04 crore; 11 arrested in multi-location raidssaam Tv
Published On
Summary
  • मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई.

  • तब्बल २.०४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त.

  • धारावी, गोवंडी, मालवणी, भायखळा, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली, माहिम परिसरात धडक कारवाया.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष (एएनसी) यांनी धारावी, गोवंडी, मालवणी-मालाड, भायखळा, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली आणि माहिम परिसरात केलेल्या धडक कारवायांमध्ये तब्बल २.०४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केलाय. पोलिसांनी ११ ड्रग्ज तस्करांना अटक केलीय. या मोहिमेत एकूण ९ कारवाया (दि. २३, २४ व २७ सप्टेंबर २०२५ या तारखेला करण्यात आल्या. पोलिसांनी जप्त मुद्देमालामध्ये १९८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन), ६ किलो २३३ ग्रॅम गांजा, ३४६ ग्रॅम हेरॉईन व ३४६० टॅबलेट्स (Nitrozepam, Alprozolam व Tramadol) यांचा समावेश आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime : मुंबईच्या धो-धो पावसात गोळीबाराचा थरार, प्रॉपर्टीच्या वादातून मित्रानेच मित्रावर झाडल्या गोळ्या

धारावी परिसरातून १४० ग्रॅम एम.डी. (किंमत ₹४२ लाख), बांद्रा येथून गांजा आणि हेरॉईन (किंमत ₹६ लाख २१ हजार), भायखळा आणि माहिममधून गांजा व हेरॉईन (किंमत ₹१.२४ कोटी), गोवंडी येथून ३४६० टॅबलेट्स (किंमत ₹१०.४७ लाख), तर गोरेगाव, बोरीवली व मालवणीतून एम.डी., हेरॉईन व गांजा (किंमत ₹२०.८४ लाख) जप्त करण्यात आले आहे. या कारवाया पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. विविध युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकांनी ही यशस्वी कामगिरी केली.

Mumbai Crime
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम'; बनावट कस्टमर पाठवून पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचा भंडाफोड

२ विदेशी नागरिकांकडून ९.४ लाखांचा कोकेन जप्त

वनराई पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. नायजेरिया व आयव्हरी कोस्ट या देशांतील या आरोपींकडून तब्बल ९ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ९६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

गोरेगाव (पूर्व) परिसरात हब मॉल येथे संशयितरित्या वावरणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे कोकेन अंमली पदार्थ आढळून आला. साय बी. रायडर उर्फ उक्कोना गोडवीन (३९ वर्षे, नायजेरियन नागरिक) एंडुबी उमा अझा (२६ वर्षे, आयव्हरी कोस्ट नागरिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींवर अंमली पदार्थ विक्रीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनराई पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com