पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली 'गंदा काम'; बनावट कस्टमर पाठवून पोलिसांकडून वेश्याव्यवसायाचा भंडाफोड

Pune Dhankawadi Crime: पुण्यातील धनकवडी येथील मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा पोलिसांकडून भंडाफोड. पुढील तपास सुरू.
Pune Dhankawadi Crime
Pune Dhankawadi CrimeSaam Tv News
Published On
Summary
  • पुण्यात धक्कादायक प्रकार उघड.

  • मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय.

  • पुढील तपास पोलिसांकडून सुरू.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. धनकवडीत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या वेश्या व्यवसायाचा भंडाफोड सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी छापा टाकला. तसेच मसाज सेंटरच्या मालकीण आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल केला. तसेच महिलांवरही गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅप्पी सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. भीम शक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय हिंगे, सुरज गायकवाड, आशिष वाघमारे, तसेच इतर सहकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी अहिल्यादेवी चौक येथील हॅप्पी स्पा सेंटरवर अनधिकृत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

Pune Dhankawadi Crime
आधी दुचाकीवरून जाताना अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची प्रकृती गंभीर, मुख्यमंत्र्यांची पोस्ट व्हायरल

त्यांनी कारवाई करण्याचीही मागणी केली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी तपास पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने धाड टाकण्याचा प्लॅन रचला. २५ सप्टेंबर रोजी पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवले.

Pune Dhankawadi Crime
शिंदे गटातील आमदाराच्या भावावर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ, रात्री ११ नंतर 'नो पेट्रोल', नेमकं कारण काय?

नंतर पोलिसांनी एकत्रित धाड टाकली. धाड टाकल्यानंतर ३० वर्षांच्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी तपास करून मसाज सेंटरची मालकीण तसेच मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक एस. एम चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com