Mumbai Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: मोबाइलसाठी हट्ट, आई-वडिलांचा नकार; १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

Goregaon News: मोबाइलसाठी १४ वर्षांच्या मुलीने आयुष्य संपवलं. ही घटना मुंबईतल्या गोरेगावमध्ये घडली. आई-वडिलांनी मोबाइल घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे या मुलीने टोकाचे पाऊल उचलले.

Priya More

संजय गडदे, मुंबई

१४ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही त्यामुळे या मुलीने टोकाचे पाऊल उचललं. राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील आरे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. १४ वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आई-वडिलांकडे या मुलीने मोबाइलसाठी हट्ट केला. मोबाइल न दिल्यामुळे मुलीचे आई-वडिलांशी भांडण केले.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही मुलगी आई-वडिलांकडे सातत्याने मोबाइलची मागणी करत होती. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता दुपारी दोन वाजता या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. आरे कॉलनीतील युनिट २२ मधील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलिस करत आहेत. फक्त मोबाइलच्या हट्ट्पायी मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गोरेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT