Shocking Crime : वॉर्ड बॉयने मला घाण इशारा केला, झोपेत वाईट स्पर्श; महिला रुग्णाने सांगितला 'त्या' रात्रीचा घटनाक्रम

Crime News : संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाणार असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि महिला रुग्णांच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Chandauli crime news ward boy
Chandauli crime news ward boySaam Tv News
Published On

चंदौली : उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंडित कमलापती त्रिपाठी जिल्हा रुग्णालयात भरती झालेल्या महिला रुग्णानं वॉर्ड बॉयवर धक्कादायक आरोप केले आहेत. वॉर्ड बॉयने बाथरुममधून मला इशारे करत शरीरावर स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. ही घटना समोर आल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदौली जिल्हा मुख्यालयातील पंडित कमलापती त्रिपाठी संयुक्त जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एका महिलेवर उपचार सुरू होते. यावेळी पीडित रुग्णाने वॉर्ड बॉयवर अत्याचार केल्याचा आरोप केला. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. एसपी सिंह तात्काळ वॉर्डमध्ये पोहोचले. त्यांनी पीडित आणि तिच्या कुटुंबियांशी सविस्तर चर्चा करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

Chandauli crime news ward boy
Indore Couple Missing : तोच पांढरा शर्ट, रक्तानं माखलेला रेनकोट, उलट्या फोटोचं गुपित; हनिमून हत्याकांडातील सोनम-राजाचं रहस्य

पीडित महिला रुग्णाने रुग्णालयातील वॉर्ड बॉयवर धक्कादायक आरोप केले असून पीडितेनं सांगितलं की, 'आम्ही रात्री झोपलो असताना, एका तरुणाने बाथरुममधून इशारा करत मला हाक मारली'. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती झोपी गेली असताना तो मुलगा तिच्याकडे आला आणि तिच्या शरीरावर वाईट स्पर्श करु लागला, पीडितेनं स्पष्टपणे सांगितलं की, 'त्याने माझ्यासोबत वाईट कृत्य केलं'.

संबंधित प्रकरणात आता पंडित कमलापती त्रिपाठी जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. एसपी सिंह यांनी प्रतक्रिया दिली आहे. 'पीडित तरुणी रुग्णालयातील कर्माचाऱ्याने गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे'. ते पुढे म्हणाले की, 'हे कळताच मी घटनास्थळी चौकशी केली आणि या संदर्भात जे प्रकरण दिसून आलं त्याची चौकशी केली जात आहे'.

Chandauli crime news ward boy
माकडं घरात घुसली, लेकरात जीव अडकला, बापाने कुऱ्हाड मारुन फेकली; डोळ्यासमोर दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com