Mumbai Marine Drive News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत महिलेची दादागिरी, भररस्त्यात महिला पोलिसाला धमकी आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल

Mumbai Marine Drive News : मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात VVIP मूव्हमेंटदरम्यान महिला ट्रॅफिक पोलिसांना एका महिलेने अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Alisha Khedekar

  • मरीन ड्राईव्ह परिसरात VVIP मूव्हमेंटदरम्यान घटना घडली

  • कार बाजूला घेण्यास सांगितल्याने महिला चालकाने ट्रॅफिक पोलिसांशी वाद घातला

  • महिला ट्रॅफिक पोलिसांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप

  • या घटनेमुळे महिला पोलिसांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

मरीन ड्राईव्ह परिसरात VVIP मूव्हमेंटदरम्यान महिला ट्रॅफिक पोलिसांना अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास NSCI, मरीन ड्राईव्ह येथे वाहतूक नियंत्रणासाठी महिला ट्रॅफिक पोलिस तैनात होत्या. त्यावेळी MH01 CD 8304 क्रमांकाची कार रस्त्यात उभी असल्याने संबंधित महिला पोलिसांनी चालकाला वाहन बाजूला घेण्यास सांगितले.

यावर कारमधून उतरलेल्या एका महिलेने संताप व्यक्त करत महिला ट्रॅफिक पोलिसांशी वाद घालत अश्लील शिवीगाळ केली. “ए *, तुझे कपडे फाटेपर्यंत मारेन… तुझ्या बापाला फोन करू का?” तसेच “नशीबवान आहेस, मी तुला आत्ता मारलं नाही,” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप आहे.

याचवेळी संबंधित महिलेने स्वतःला एका राजकीय नेत्याची नातेवाईक असल्याचे सांगत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर संबंधित महिला ट्रॅफिक पोलिस तक्रार देण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गेल्या.

मात्र तेथील एका पोलिस अधिकाऱ्याने “ये सब रोज होता है यहाँ,” असे सांगितल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संबंधित महिलेवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT