All Details On BKC Pod Taxi: मुंबई अन् प्रवास...हे नांत मुंबईत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतं. मुंबईत कुठेही फिरायचं म्हटलं की, सर्वातआधी डोळ्यासमोर जे चित्र येतं, ते म्हणजे तुमची आमची आणि आपल्या सगळ्यांची लाडकी 'लोकल ट्रेन'. मात्र मुंबई असो किंवा अन्य ठिकाणी प्रवास करण्यासाठी ऑटोरिक्षा आणि विविध वाहनांचा वापर आपण करत असतो. मात्र मुंबई सारख्या शहरात दररोज लाखोंच्या संख्येने अनेक प्रवासी एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे अनेक वाहतुकीच्या साधनांची कमतरता जाणवत असते.
मुंबईतील(Mumbai) वाहतुकीची समस्या आपल्यापैंकी प्रत्येकाला जाणवत असते. या समस्येच्या निराकरणासाठी सरकार वेळोवेळी अनेक प्रकल्प सुरु केले आहेत ,ज्याच्या मदतीने मुंबईकरांची वाहतुकीच्या समस्येपासून सुटका होईल. यात गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील एका महत्त्वाच्या शहरात एक प्रकल्प सुरु होणार आहे,ज्याच्या मदतीने मुंबईकर लवकरच वाहतुकीच्या समस्येमधून मुक्त होतील. चला तर या प्रकल्पाबद्दल सविस्तर(in detail) जाणून घेऊयात.
मुंबई शहर अनेक उपनगरांचे विस्तृत जाळे आहे. याच मुंबईत आपल्याला अनेक वाहतुकीचे जाळे आढळून येते. कुठे मेट्रो तर कुठे मोनो ट्रेन(Train). मात्र मुंबईकरांचा प्रवास अजून सुखकर व्हावा यासाठी ''पॉड टॅक्सी''ची सेवा सुरु करण्यात येणार आहे. ही पॉड टॅक्सीची सेवा प्रवाशांना वांद्रे-कुर्ला मार्गासाठी वापरता येणार आहे. मात्र त्यासाठी अजून साधारण प्रवाशांना ३ वर्षाचा कालावधीची वाट पाहावी लागणार आहे. पॉड टॅक्सीमुळे दररोज कामासाठी वांद्रे- कुर्ला अंतर जाणाऱ्या प्रवाशांना पॉड टॅक्सीची(Taxi) सेवा अतिशय सोयीस्कर ठरणार आहे.
कुर्ला-बीकेसी- वांद्रे गेल्या काही वर्षात या भागात अनेक ऑफिसचे(Office) जाळे विस्तारलेले आहे. अनेक आयटी कंपनीपासून ते अनेक मीडिया हॉऊस येथे स्थापन झालेले आहे. दररोज अनेक कामगारी वर्ग येथे येत असतो. त्यामुळे स्टेशनपासून (station) येथे येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होतात. मात्रसाठी सरकारने पॉड टॅक्सी या उपाय शोधून काढला आहे. मात्र तुम्हाला पॉड टॅक्सी प्रकल्पाचे मुख्य कोण आहेत माहिती आहे का?.
अर्थात पॉड टॅक्सी प्रकल्प कोण साकार करणार ते माहिती आहे का? कुर्ला-बीकेसी- वांद्रे भागात असलेली रोज होत असलेली वाहतुक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पॉड टॅक्सीचा प्रकल्प हा 'हैद्राबाद' येथील ''साई ग्रीन मोबिलिटी'' या कंपनीला देण्यात येणार आहे. घेतलेला सर्व निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेला होता. पॉड टॅक्सीसाठी असलेल्या प्रकल्पासाठी तब्बल १ हजार १६ कोटींचा खर्च (expenses)अपेक्षित होणार असल्याचे समजते. मुख्य म्हणजे महत्त्वाचे असलेले वांद्रे ते कुर्ला मार्गावर २०२७ या वर्षापर्यंत पॉड टॅक्सी धावण्याची शक्यता आहे.
पॉड टॅक्सी असलेल्या प्रकल्प मार्गाची लांबी- ८.८ किमी असेल.
कुर्ला(Kurla) रेल्वे स्थानक ते वांद्र रेल्वे स्थानक असा या पॉड टॅक्सीचा मार्ग असेल.
पॉड टॅक्सी प्रकल्पामध्ये एकूण ३८ स्थानके असतील.
पॉड टॅक्सीचा वेग प्रतितास ४० किमी एवढा असेल.
पॉड टॅक्सीची ६ प्रवासी एवढी वाहून नेण्याची क्षमता असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.