Big Relief for Commuters Saam Tv
मुंबई/पुणे

Good News: मुंबईवरून नवी मुंबईला जा सुसाट, ४० मिनिटांचा प्रवास फक्त १० मिनिटात; सरकारचा जबरदस्त प्लान

Goregaon–Mulund Link Road: मुंबई ते नवी मुंबई प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. या प्रवासाचा कालावाधी ४० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार आहे. १.३ किमी लांबीचा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे १,३८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Priya More

Summary -

  • बीएमसीकडून ऐरोली- मुलुंड उड्डाणपुलाच्या निविदा प्रक्रियेला वेग

  • १.३ किमी लांबीच्या या उड्डाणपुलासाठी सुमारे १,३८९ कोटी रुपयांचा खर्च

  • हा प्रोजेक्ट गोरेगाव- मुलुंड लिंक रोडच्या तिसऱ्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आहे

  • प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा वेळ ४० मिनिटांवरून फक्त १० मिनिटांवर येणार

मुंबई आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई ते नवी मुंबई प्रवास आता सुसाट होणार आहे. नवी मुंबईला जाण्यासाठी लागणारा ४० मिनिटांचा प्रवास आता फक्त १० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. १,३८९ कोटींच्या उड्डाणपुलामुळे ऐरोली-मुलुंड प्रवास फक्त १० मिनिटांचा होणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास सोपा करण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याला वेग दिला आहे.

पूर्व मुक्त महामार्ग आणि नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-१० ला जोडणाऱ्या १.३ किलो मीटर लांबीच्या उड्डाणपुलासाठी मुंबई महानगर पालिकेने निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेली आहे. या उड्डाणपुलासाठी जवळपास १,३८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर दोन्ही शहरातील वाहतूक सुसाट होईल आणि वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

या प्रकल्पात थेट कनेक्टिव्हिटीवर भर देण्यात आला आहे. हा उन्नत मार्ग पूर्व मुक्त महामार्गाला थेट नवी मुंबईतल्या ऐरोलीशी जोडणार आहे. यामुळे ऐरोली आणि मुलुंडदरम्यानच्या वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे. तासंतास एकाच ठिकाणी अडकून राहणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. हा प्रकल्प गोरेगाव-मलंड लिंक रोडच्या तिसऱ्या टप्प्याचा एक महत्वाचा भाग असणार आहे.

खाडी परिसर आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून हा उड्डाण पूल जाणार असल्याने बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रोजेक्टमुळे ठाणे आणि वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक विभागली जाईल. ज्यामुळे मुलुंड चेक नाका आणि ऐरोली टोल नाक्यावरील ताण कमी होईल. या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. ऐरोली टोलनाका आणि मुलुंड चेकनाका परिसरात होणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांना या प्रवासासाठी ३० ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर हा वेळ वाचेल.

या उड्डाणपुलामुळे पश्चिम उपनगरामध्ये येणारी वाहनं कोणत्याही अडथळ्याशिवाय नवी मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील. जीएमएलआर आणि हा ऐरोली कनेक्टर पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. ठाणे आणि वाशीच्या दिशेने जाणारी वाहतूक विभागली जाईल. याचा थेट फायदा गोरेगाव, मालाड आणि मुलुंडमधील प्रवाशांना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news: स्मशानात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार, २ तास डांबून ठेवल्यानंतर नराधमांच्या तावडीतून केली सुटका

साताऱ्यातच बंडाची पहिली ठिणगी, महेश शिंदे शिंदेसेना सोडणार?

IPL 2026 मध्ये CSKवर काळी जादू? थेट BCCIकडे तक्रार; व्हायरल व्हिडिओ आणि पत्राचं सत्य काय?

Rohit Sharma: रोहित शर्मा फीट असूनही प्लेईंग ११ मधून का बाहेर? चाहत्यांच्या मनात मोठा प्रश्न

लॉजमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले

SCROLL FOR NEXT