Saam Tv
नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते, जे सौंदर्य खुलवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे तेल काखेत लावून दररोज मसाज केल्याने काही दिवसातच फरक जाणवेल.
ऑलिव्ह ऑईल केसांचे सौंदर्य जरी वाढवत त्याचसोबत काखेतला काळपटपणा देखील दूर करता येतो. यात ब्राऊन शुगर मिसळून काही वेळ स्क्रब करावे. यामुळे त्वचा हळूहळू उजळू लागेल.
वॅक्सिंग केल्यानंतर हा प्रयोग अजिबात करू नका. त्यामुळे जळजळ होऊ शकते. अंघोळ करण्यापूर्वी काखेत लिंबू चोळा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
पिगमेंटेशनसाठी अॅलोवेरा बेस्ट असते. अॅलोवेरा जेल आठवड्याचे ३ दिवस काखेत लावल्याने काळपटपणा दूर व्हायला मदत होईल. त्वचेला थंडावा देखील मिळेल.
आठवड्यातून १-२ वेळा स्क्रब करून डेड स्किन काढून टाका. त्यामुळे काख स्वच्छ राहिल आणि काळेपणा कमी होईल
बेसन, दही, आणि लिंबाचा रस हा त्वचेचा काळपटपणा घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे. हा पॅक काखेत तासभर लावल्याने फरक दिसून येईल.
वारंवार शेव्हिंग केल्याने काख अधिक काळी दिसू शकते. त्वचेला कमी त्रास देणारी योग्य पद्धत निवडा आणि मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
अल्कोहोल किंवा तीव्र सुगंध असलेली उत्पादने त्वचेला त्रास देऊ शकतात. त्यामुळे काखेत अधिक काळपटपणा होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.