Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही

Mumbai-Pune Railway Travel: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता सुसाट होणार आहे. लोणावळ्यात मालगाड्यांमुळे प्रवासी ट्रेन्सला थांबावे लागत होते. पण आता लोहमार्गाच्या विस्तारिकरणामुळे ट्रेन्सला थांबावे लागणार नाही.
Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही
Mumbai-Pune Railway LineSaam Tv
Published On

Summary:

  • लोणावळा रेल्वे स्टेशनवर यार्ड रिमॉडेलिंग काम पूर्ण

  • ७०० मीटर मार्गिका वाढवून ८५० मीटरहून अधिक करण्यात आली

  • मालगाड्यांसाठी स्वतंत्र लूप लाइन्स तयार करण्यात आली

  • त्यामुळे प्रवासी ट्रेन्सना थांबण्याची गरज लागणार नाही

  • मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ यापुढे कमी होणार

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याचा रेल्वे प्रवास आता सुसाट होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन अँड डिस्पॅच लाइनच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मालगाड्यांमुळे लोणावळ्यात प्रवासी ट्रेन्सला थांबावे लागत होते. पण आता लोहमार्गाचे विस्तारीकरण झाल्यामुळे यापुढे लोणावळा रेल्वे स्थानकावर ट्रेन्सला जास्त वेळ थांबण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुसाट होईल आणि त्यांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई आणि मुंबई - पुणे रेल्वे प्रवासात आता जलद होणार आहे. प्रवासी गाड्यांना मालगाड्यांसाठी लोणावळ्यात प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण मुंबई रेल्वे प्रशासनाने लोणावळा रेल्वे स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग करताना लोहमार्गाचे विस्तारीकरण केले आहे. लोहमार्गाची लांबी सुमारे १५० मीटरने वाढवण्यात आली आहे. याठिकाणी दोन नवीन लूप लाइन्स देखील सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे लोणावळा रेल्वे स्थानकावरील रेल्वेगाड्यांची हाताळणी जलद, सुरक्षित होईलच. त्यासोबतच गाड्या हाताळण्याची क्षमतादेखील वाढली आहे.

Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही
Mumbai Railway: मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट, २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार; रेल्वेची ब्लू प्रिंट कशी आहे?

लोणावळा रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन अँड डिस्पॅच लाइनचे विस्तारीकरणाचे काम सुरू होते. हे काम अखेर पूर्ण झाले आहे. ७०० मीटर असलेली मार्गिका आता ८५० मीटरहून अधिक मोठी झाली. त्यामुळे मालगाड्या बँकरसह म्हणजे डोंगराळ भागात जोडलेले अतिरिक्त इंजिन सहज त्या मार्गिकवर समावले जात आहे. व्हायचं असं की पुणे- मुंबई आणि मुंबई-पुणे प्रवास करताना मालगाड्यांमध्ये लोणावळ्यामध्ये प्रवासी ट्रेन्सला १५ ते २० किंवा त्यापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत होते. पण आता या ट्रेन्सला थांबण्याची गरज लागणार नाही. लोणावळ्यात लोहमार्गत केलेल्या बदलामुळे सगळ्यात जास्त फायदा प्रवासी ट्रेन्सला होणार आहे.

Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही
Railway News : प्रवाशांसाठी मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी लागणार 'ओटीपी' ; काय आहे रेल्वेचा नियम? वाचा

प्रवासी आणि मालगाड्यांना बँकर लावण्यासाठी किमान १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागतो. यावेळेत देखील आता बचत होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावर बँकर काढण्यासाठी आणि लावण्यासाठी किमान १० ते १५ मिनिटे वायाला जायची. पण आता या मालगाड्यांसाठी स्वतंत्र लूप लाइन असल्याने तेथेच बँकर जोडले जाईल. त्यामुळे मेन लाइन प्रवासी टेन्ससाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रेन्स न थांबता त्या डायरेक्ट प्रवास करू शकणार आहेत.

Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही
Railway News : बॅग भरो निकल पडो! रेल्वे प्रवाशांना नववर्षाआधीच मोठी भेट, 'या' मार्गांवर धावणार अतिरिक्त ट्रेन, वाचा वेळापत्रक

लोणावळ्यात अनेक प्रवासी ट्रेन्सला क्रॉसिंग किंवा पुढे जाण्यासाठी म्हणजे ओव्हरटेकिंगसाठी थांबावे लागत होते. आता त्याची आवश्यकता लागणार नाही. लोणावळ्यात ट्रेन्सला थांबावे लागण्याचा वेळ कमी होईल ज्यामुळे पुणे ते मुंबई एकूण प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. विस्तारित लाइन्समुळे एकाच वेळी अनेक गाड्यांची क्रॉसिंग, ओव्हरटेकिंग आणि प्रस्थान अधिक जलद होईल. गाड्यांच्या वेळेत होणारा विलंब देखील कमी होईल. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होईल.

Good News: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास सुसाट, यापुढे ट्रेन्सला लोणावळ्यात जास्त वेळ थांबावे लागणार नाही
Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती; २२००० रिक्त जागांवर नोकरीची संधी; रेल्वे मंत्रालयाची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com