Mumbai Railway Station Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Railway: मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट, २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार; रेल्वेची ब्लू प्रिंट कशी आहे?

Mumbai Railway Station: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत. रेल्वेचा ब्लूप्रिंट कसा असेल घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • मुंबईतील ४ टर्मिनसवर एकूण २० नवीन प्लॅटफॉर्म बांधले जाणार

  • परळ, कल्याण, एलटीटी आणि पनवेल येथे प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार

  • लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता

  • सीएसएमटी आणि दादरवरील गर्दी कमी होण्यास मदत

रेल्वे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुसाट होण्याची शक्यता आहे. पुढील ५ वर्षांत मुंबईतील ४ प्रमुख एमएमआर टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार असल्याने मुंबईहून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या ट्रेनची संख्याही वाढेल. म्हणजेच मुंबईतील रेल्वे स्थानकांवर अधिक प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या चार टर्मिनसवर २० नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचा प्लान सुरू आहे. परळ रेल्वे स्थानकावर ५, कल्याण रेल्वे स्थानकावर ६, लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजे एलटीटी रेल्वे स्थानकावर ४ आणि पनवेल रेल्वे स्थानकावर ५ प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहे. यामुळे स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होईल. वाढती लोकसंख्या आणि लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून हे महत्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.

२०२५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, परळ टर्मिनस कुर्ला आणि परळ दरम्यानच्या नवीन ५ व्या आणि ६ व्या मार्गाशी जोडले जाईल. ज्याचा वापर फक्त मेल/ एक्स्प्रेस गाड्यांसाठी केला जाईल. या टर्मिनसमुळे मुंबईच्या मध्यभागी असलेल्या सीएसएमटी आणि दादर सारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवरील भार काही प्रमाणात कमी होईल. सध्याचे परळ रेल्वे स्टेशन अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत नूतनीकरण करण्यात आले आहे. भविष्यात जेव्हा प्लॅटफॉर्म जोडले जातील तेव्हा स्टेशनवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांची सेवा देखील वाढेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचा प्लान आहे. हे स्टेशन लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मुख्य टर्मिनल आहे आणि नवीन प्लॅटफॉर्म बांधल्यानंतर या सुविधांमुळे इंटरसिटी आणि एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढेल आणि गर्दी कमी होईल. त्याचप्रमाणे वेगाने विकसित होत असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकावर ५ नवीन प्लॅटफॉर्म बांधले जातील. पनवेल भविष्यात मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, नवी मुंबई एअरपोर्ट आणि मेट्रो नेटवर्कसह एक प्रमुख वाहतूक इंटरचेंज बनण्यास सज्ज आहे. येत्या काही वर्षांत तयार करण्यात येणाऱ्या या प्लॅटफॉर्ममुळे मध्य रेल्वेच्या सेवांमध्ये लक्षणीय वाढ होईल. सध्या मध्य रेल्वेच्या १,८१० उपनगरीय सेवांमधून दररोज अंदाजे चार दशलक्ष प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूजमध्ये तासभरापासून EVM बंद

Taj Mahal: कोणाच्या जमिनीवर बांधला गेल्या ताजमहाल? पाहा कोण होचं जमिनीचा मालक?

Pune Police : वाहतूक कोंडीची कटकट मिटवण्यासाठी थेट आयुक्त रस्त्यावर उतरले, भल्यापहाटे घेतला आढावा

Office Snacks: ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड खाण्याऐवजी 'हा' पदार्थ कायम बॅगमध्ये ठेवा

मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

SCROLL FOR NEXT