Thane-Borivali Road Saam Digital
मुंबई/पुणे

Thane-Borivali Road: अवघ्या २० मिनिटात पोहोचता येणार ठाण्याला, कसा आणि कुठून करता येणार प्रवास? जाणून घ्या

Thane-Borivali Road: मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गाचे काम फास्ट ट्रॅकवर सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या मार्गासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर चारच दिवसांत केंद्रीय वन विभागानेही भुयारी मार्गाला परवानगी दिली आहे.

Sandeep Gawade

Thane-Borivali Road

मुंबई-ठाण्याला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गाचे काम फास्ट ट्रॅकवर सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या मार्गासाठी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर चारच दिवसांत केंद्रीय वन विभागानेही भुयारी मार्गाला परवानगी दिली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दोन्ही परवानग्या मिळाल्याने भुयारी मार्गाच्या कामाला वेग येणार आहे.

मुंबईहून ठाण्याला जाताना वाहनधारकांना घोडबंदर रोडवर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. एक-दीड तास वेळ आणि इंधन मोठ्या प्रमाणात खर्ची पडते. त्यामुळे मुंबईकरांबरोबरच ठाणेकरांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातून तब्बल १६ हजार ६०० कोटी रुपये खर्चून बोरिवली-ठाणे दरम्यान सुमारे १२ किलोमीटर लांबीचा दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर या मार्गासाठी आवश्यक असलेल्या परवानगी मिळवण्याचे काम सुरू आहे. नुकतीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला परवानगी दिली असून आज केंद्रीय वन विभागाने पहिल्या टप्प्यातील परवानगी दिल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असा असेल भुयारी मार्ग

बोरिवली-ठाणे हा दुहेरी भुयारी मार्ग एकूण १२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यापैकी ७.४ किलोमीटर लांबीचा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात; तर ४.४३ किलोमीटरचा बोगदा ठाणे जिल्ह्यात असणार आहे. तसेच बोगद्याच्या दोन्ही बाजूला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा जोडमार्ग असणार आहे. हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर बोरिवलीहून अवघ्या २० मिनिटांत ठाण्याला पोहोचता येणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

Unhealthy Sleeping Pattern: 8 तासांची झोप घेऊनही तुमच्याकडून नकळत होतेय 1 चूक; आजारी पडण्याची शक्यता वाढते

SCROLL FOR NEXT