मुंबई दहशतवादी अटक प्रकरण | पोलिस प्रोफेशनलपणे काम करतील - गृहमंत्री वळसे-पाटील Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबई दहशतवादी अटक प्रकरण | पोलिस प्रोफेशनलपणे काम करतील - गृहमंत्री वळसे-पाटील

दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील २ दहशतवादी महाराष्ट्राचे असून त्यातला एक मुंबईचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील २ दहशतवादी महाराष्ट्राचे असून त्यातला एक मुंबईचा आहे. या कारवाईनंतर राज्यात खळबळ माजली आहे. मुंबई एटीएस पथकाला या अटकेतची माहिती नव्हती का असा सवाल खुद्द गृहमंत्र्यांनी एटीएसला विचारला. याबाबत तातडीची बैठक झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे. (Mumbai terror arrest case | Police will work professionally - Home Minister Walse-Patil)

हे देखील पहा -

माध्यमांशी बोलताना वळसे-पाटील म्हणाले की, या अटकेवर एटीएसची नजर असून काम सुरु आहे. पोलिसांना त्यांच्या सोयीप्रमाणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. पोलिस प्रोफेशनलपणे काम करत हे प्रकरण हाताळतील असंही गृहमंत्री म्हणाले आहेत. भाजपने याबाबत केलेल्या टीकेलाही वळसे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पोलिसांना मदत केली पाहिजे टीका नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. त्याचप्रमाणे हा राजकारणाचा विषय नाही असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या या ६ दहशतवाद्यांपैकी २ जण महाराष्ट्राचे होते. त्यातला एक मुंबईच्या सायनमध्ये राहणारा असून त्याला धारावीमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सेलने ताब्यात घेतलेला आरोपी जान मोहम्मद शेख याच्या पत्नी आणि दोन मुलींना धारावी पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. जान मोहम्मद याच्याकडे शस्त्र पोहचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती,जान मोहम्मदच्या पत्नीकडे तो कुणा कुणाच्या संपर्कात होता याची माहिती घेतली जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT