mumbai crime News  Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत भाडेकरूनेच घातला मालकाला गंडा; ६५ लाखांचे सोने घेऊन फरार, पश्चिम बंगाल कनेक्शन उघड

mumbai crime News : मुंबईत भाडेकरूनेच घातला मालकाला गंडा घातल्याचे समोर आलं आहे. आरोपी ६५ लाखांचे सोने घेऊन फरार झाला आहे.

Vishal Gangurde

भाडेकरूने मालकासह चार जणांची केली फसवणूक

भाडेकरू 457 ग्रॅम सोनं घेऊन फरार

आरोपीने एकूण 55 ते 65 लाखांची केली फसवणूक

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईत भाडेकरूनेच मालकाला लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भाडेकरू मालकाचे 16 लाख 50 हजारांचे सोनं घेऊन भाडेकरू फरार झाले. या भाडेकरूने मालकासह आणखी तीन जणांचीही फसवणूक केली. इतर तक्रारदारांचे 70, 108 आणि 118 ग्रॅम सोनंही घेऊन आरोपी फरार झाला आहे. फसवलेल्या सोन्याची एकूण किंमत अंदाजे 55 ते 65 लाख रुपये इतकी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीण मटकर यांचे कुर्ल्यात ७-८ रुम आहेत. त्यापैकी दोन रुम हे सुकेंदू सामंत याला भाड्याने दिल्या होत्या. सुकेंदू एका खोलीत कुटुंबासह वास्तव करत होता. तर दुसऱ्या खोलीत दागिन्यांचा कारखाना होता. सुकेंदू सामंत हा तब्बल १८ ते २० वर्षांपासून मटकर यांचा भाडेकरू होता. मटकर यांनी 200 ग्रॅम सोनं देत दागिन्यांची ऑर्डर दिली होती.

कामात विलंब होत असल्याने आणखी 20 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट दिले. काही दिवसांनी सकाळी पाहता सुकेंदू आणि त्याची पत्नी घरातून बेपत्ता झाली. चौकशीनंतर तो मुळ गावी पश्चिम बंगालला गेल्याची माहिती मिळाली. सुकेंदूच्या भावामार्फत संपर्क साधत पत्नी मधुमिताशी संवाद साधला. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये बोलावून फक्त ५९ ग्रॅम दागिने परत दिले. उर्वरित 160 ग्रॅम सोनं अद्याप परत केलेल नाही.

मटकर यांच्यासह आणखी तीन जणांचीही फसवणूक झाली आहे. इतर तक्रारदारांचे प्रत्येकी 70, 108 आणि 118 ग्रॅम सोनंही घेऊन फरार झाले. एकूण 457 ग्रॅम सोन्याची फसवणूक झाली. फसवलेल्या सोन्याची एकूण किंमत अंदाजे 55 ते 65 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी कुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT