MUMBAI LOCAL MEGA BLOCK: CENTRAL RAILWAY ANNOUNCES MAJOR SERVICE CHANGES ON MAIN AND HARBOUR LINES Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Megablock: रेल्वे प्रवाशांचे रविवारी होणार हाल; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे, जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Railway Mega Block Today : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेने १३ ते १४ जून २०२६ रोजी मेन लाईन आणि हार्बर मार्गावर विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहे.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेने १३-१४ जून रोजी मेन लाईनवर विशेष मेगा ब्लॉक

  • भायखळा ते विद्याविहार दरम्यान रात्री १२.४५ ते पहाटे ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक

  • CSMT ते कुर्ला दरम्यान मध्यरात्री १२.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत लोकल बंद

  • अनेक हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

Mumbai Central Railway Mega Block News प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी १३ आणि १४ जून २०२६ च्या मध्यरात्री मेन लाईनवर विशेष मेगा ब्लॉक आणि १४ जून रोजी हार्बर मार्गावर दिवसाचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम होणार असून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेने (Madhya Railway Mega Block Today) दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर रात्री १२.४५ ते पहाटे ३.४५ वाजेपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सायन येथील रेल्वे उड्डाणपूल (ROB) संबंधित कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या विशेष ब्लॉकमुळे १३ आणि १४ जूनच्या मध्यरात्री १२.१० ते पहाटे ४.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कुर्ला दरम्यान उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे उशिरा रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याशिवाय, रविवारी १४जून रोजी हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० वाजेपर्यंत डाउन मार्गावर, तर चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटी अप मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:२० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पनवेल, बेलापूर, वाशी, गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप मार्गावरील अनेक ट्रेन देखील बंद राहतील.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष लोकल सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कालावधीत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करता येणार आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वे पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत. या कामांमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन पावसाळ्यात मॅनहोलच्या कामांचा आदेश कुणाचा? मॅनहोलच्या निर्णयावरून अधिकाऱ्यांमध्येच मतभेद

बेपर्वा पालिका निष्पापांचे बळी, 6 जणांचे मारेकरी कोण?

'नागरिक सरकारचे गुलाम आहेत का?' 'पोलीस पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे नव्हे जनतेचे सेवक'

'राम मंदिर पैशांचा वापर पक्षफोडीसाठी', उद्धव ठाकरेंचा भाजपवर मोठा आरोप, ठाकरेंचा भाजपविरोधात रामरक्षा आंदोलन

Akshay Kumar: अक्षय कुमारने विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट; १२ कोटींपेक्षा जास्त झाला फायदा

SCROLL FOR NEXT