Pune Train Cancel Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Train Cancel: पुण्याहून सुटणाऱ्या ८ ट्रेन रद्द, एकही लोकल धावणार नाही, प्रवाशांना फटका

Pune Railway Local Train Cancelled Today: पुणे रेल्वे स्टेशनवर काल वंदे भारत एक्सप्रेसचे तीन डबे घसरले. याचा फटका रेल्वे वाहतूकीला बसला आहे. पुणे स्टेशनवरन सुटणाऱ्या ८ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे.

Siddhi Hande

पुणे रेल्वे स्टेशनवरुन एकही लोकल सुटणार नाही

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरल्याने रेल्वेसेवेवर परिणाम

पुणे स्टेशनवरुन ८ ट्रेन रद्द

पुणे रेल्वे स्टेशनवर काल रात्री वंदे भारतचा डबा रुळावरुन खाली घसरला.याचा रेल्वेला चांगलाच फटका बसला आहे. अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. रेल्वे स्टेशनवरुन दोन दोन तास उशिराने ट्रेन धावत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण झाले असून काही ट्रेन सुरळीत सुरु आहेत. तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

पुणे स्टेशनवरुन एकही लोकल सुटणार नाही (No Local Train From Pune Station Today)

पुणे ते लोणावळा लोकल आज सुटणार नाहीये.आज पुणे रेल्वे स्टेशनवरुन एकही ट्रेन सुटणार नाहीये. दुपारी १ पर्यंत सगळ्या लोकल या शिवाजीनगर स्टेशन वरून सुटणार आहेत.त्यामुळे जे प्रवासी पुणे स्टेशनवरुन ट्रेन पकडणार होते त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे स्टेशन वरून जाणाऱ्या आठ ट्रेन आज रद्द करण्यात आल्या आहेत. लोकल ट्रेन शिवाजीनगर वरून सुटतील. अनेक गाड्या उशिराने धावत आहे पुणे CSMT, पुणे निजामुद्दीन, CSMT कोल्हापूर, CSMT बंगळुरु या रेल्वे गाड्या रिशेड्युल करण्यात आल्या आहेत.

रद्द करण्यात आलेल्या ट्रेनची यादी (Pune These Train Cancelled Today)

पुणे स्टेशनवरुन येणाऱ्या 8 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या दोन तास उशिराने धावत आहे.

सोलापूर सीएसएमटी

पुणे लोणावळा

पुणे फलटण

फलटण लोणंद

लोणंद फलटण

फलटण पुणे

दुपारनंतर सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशी माहिती जनसंपर्क अधिकारी यांनी दिली. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होईल. परंतु तोपर्यंत प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT