Mumbai Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident News : शीव अपघात प्रकरण: वृद्ध महिलेला कारने चिरडणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने सुनावली शिक्षा

Mumbai News: पुणे शहरातील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईतील एका रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आवारात एका वृद्द महिलेला उडविले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मागील काही दिवसांपासून राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे शहरातील अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत देखील एका कारने वृद्ध महिलेला चिरडलं आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी कारचालक डॉक्टरला अटक केली त्यानंतर पोलिसांनी डॉ.डेरे यांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी डेरे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती मात्र २०,००० रुपयांच्या कॅश बाँडवर डॉ राजेश ढेरे यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

दरम्यान, डॉक्टरला अटक करण्यास ऐवढा विलंब का झाला, असा प्रश्न मृताचे नातेवाईक उपस्थित करीत आहेत. आता निर्माण झाला आहे. रुबेदा शेख (६०) असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी डॉक्टर राजेश याला ताब्यात घेतले आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यास विलंब झाल्यामुळे राजेशला अटक करण्यात उशीर झाला असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

घटना नेमकी कशी घडली?

शीव (shiv)रुग्णालयाजवळ असलेल्या ओपीडी इमारतीच्या गेट क्रमांक ७ समोर एक वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत पडली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी रात्री रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. संपूर्ण माहिती मिळताच शीव पोलिस ठाण्याचे पथक रुग्णालयात तात्काळ दाखल झाले.

या अपघातातील वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पोलिसांना तिचा जबाब नोंदवता आला नाही. मात्र, पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत महिलेची ओळख पटवली. तसेच तिच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधला. घटनेबाबत पोलिसांनी अधिकची चौकशी केली असता, एका डॉक्टराच्या(doctor) कारने वृद्ध महिलेले धडक दिल्याचं कळालं.

पोलिसांनी रुग्णालय आवारातील सीसीटीव्ही फुटेज मागितले असता, रुग्णालय प्रशासनाने ते देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, डॉ. डेरे  च्या कारनेचं रुबेदा या वृद्ध महिलेला चिरडल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी डॉ. डेरे  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

SCROLL FOR NEXT