Mumbai Crime news  Saam tv
मुंबई/पुणे

ऐन निवडणुकीत मुंबईत रक्तरंजित थरार; शिंदे गटाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, पोटात चाकू खुपसला

Mumbai Crime news : ऐन निवडणुकीत मुंबईत रक्तरंजित थरार पाहायला मिळतोय. शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसण्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

राज्यात काही ठिकाणी निवडणुकीला गालबोट

शिंदे सेनेच्या उमेदवाराला जीवघेणा हल्ला

जीवघेणा हल्ल्याने परिसरात खळबळ

राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी गालबोल लागण्याच्या घटना घडत आहेत. सोलापूर आणि अकोल्यात हत्येच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईत शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर जीवघेणा झाल्याची घटना घडली आहे. वांद्रे येथील ज्ञानेश्वरनगरात प्रचारादरम्यान हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने पोटात चाकू भोसकल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राजकीय व्यक्तीवर हल्ले होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शिंदे गटाच्या उमेदवार नेमका कोणी हल्ला केला, याची नावे समोर आलेली नाही. हल्ल्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोण आहेत हाजी सलीम कुरेशी?

हाजी सलीम कुरेशी हे शिंदे गटाचे नेते आहेत. ते याआधी एमआयएम पक्षात कार्यरत होते. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंनी त्यांना उमेदवारी जाहीर केली.

तत्पूर्वी, राज्यात गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली. तर अकोल्यात काल काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची हत्या झाली. तर आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाला. एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांना मारहाण आणि हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

मोठी बातमी! टर्म संपण्याआधीच राष्ट्रपती राजीनामा देणार? भारताशेजारील देशात काहीतरी घडतंय

Yoga For Weight Loss: डाएट आणि एक्सरसाइझ करूनही वजन कमी होत नाही? मग रोज २० मिनिटं करा 'हा' एक योगा

SCROLL FOR NEXT