mumbai SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai : फी न भरल्याने विद्यार्थिनीचा शाळेने केला छळ; मुंबईतील नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेसह वर्गशिक्षिकेवर गुन्हा

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

Shardashram Vidyamandir International School News : फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला परिक्षेस बसू न देता वर्गातून बाहेर काढल्याचा प्रकार मुंबईतील एका शाळेत घडला. या धक्कादायक प्रकाराची माहिती विद्यार्थिनीच्या पालकांना समजताच त्यांनी पाेलिस ठाण्यात धाव घेतली. पाेलिसांनी (police) पालकांच्या तक्रारीनंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थिनीच्या (student) वर्ग शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दादर येथे शारदाश्रम इंटरनॅशनल शाळा आहे. या शाळेत सध्या परिक्षा सुरु आहे. शाळेची फी न भरल्याने इयत्ता दुसरीतील एका विद्यार्थीनीला अकरा जानेवारीला शिक्षकांनी परीक्षेस बसण्यास नकार दिला. संबंधित विद्यार्थीनीला अन्य वर्गात दोन पुरुष शिक्षकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. (Breaking Marathi News)

या प्रकाराची माहिती मुलीच्या पालकांना समजली. त्यानंतर मुलीच्या आईने (mother) दादर पोलिस ठाण्यात जाऊन शाळेत घडलेला प्रकार कथन करुन गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली. आईने दिलेल्या तक्रारीनंतर पाेलिसांनी मुख्याध्यापिका आणि वर्गशिक्षिका (teacher) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT