Mumbai Best Bus Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Fire: मुंबईत BEST बसला आग; मोठा अनर्थ टळला

Best Bus Fire: मुंबईत एका बेस्ट बसला आग लागली. आज सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास मुंबईतील नागपाडा सिग्नलजवळ या बसला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpada Best Bus Fire :

मुंबईत एका बेस्ट बसला आग लागली. आज सकाळी ८.२० वाजताच्या सुमारास मुंबईतील नागपाडा सिग्नलजवळ या बसला आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.

शनिवारी सकाळी बेस्ट बस नागपाडाच्या दिशेत जात होती. तेव्हा बसला आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही. वेट लीज ऑपरेटर मातेश्वरी यांच्या मालकीची ही बस होती. ही बस इलेक्ट्रिक हाउस येथून सांताक्रूझ बस डेपोच्या दिशेने जात होती.

ही बस नागपाडा जे जे हॉस्पिटलजवळ येताच बसने पेट घेतला. बसला आग लागताच आजूबाजूच्या लोकांची मोठी पळापळ झाली. बसमध्ये चालक आणि वाहक होते. परंतु, आग लागताच त्यांना बसमधून खाली उतरवण्यात आले. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण आणण्यात त्यांना यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक पोलीस आणि बेस्टचे अधिकारी पुढील तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये बसला आग

काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये एका बसला आग लागली होती. नांदेडहून नागपूरला जाणाऱ्या बसला आग लागली होती. या आगीत बस पूर्णतः खाक झाली होती. बस प्रवाशांनी भरलेली होती. प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले होते. त्यामुळे मोठी हानी टळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT