Central Railway News: मध्य रेल्वेवर नेहमीच प्रवाशांचा खोळंबा का? ट्रेन उशिरा येण्यामागचं कारण कळलं

Alarm Chain Pulling News: मध्यरेल्वेला कायमच गर्दी पाहायला मिळते. जीव मुठीत घेऊन चाकरमानी प्रवास करतात. अशात ट्रेन काही मिनीटे जरी लेट झाली तरी प्रवाशांचं पुढचं सर्वच गणित बिघडतं.
Central Railway News
Central Railway NewsSaam TV
Published On

Mumbai News:

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ट्रेन लेट होते अशी तक्रार कायमच असते. मुंबईच्या (Mumbai) उपनगरांतून अनेक चाकरमानी दररोज मुंबईसह पनवेल, वाशी गोरेगाव अशा विविध ठिकाणी प्रवास करतात. प्रवासात वेसटर्न, हार्बर आणि ट्रान्सहार्बर येथे फारशी गर्दी नसते. मात्र मध्यरेल्वेला कायमच गर्दी पाहायला मिळते. जीव मुठीत घेऊन चाकरमानी प्रवास करतात. अशात ट्रेन काही मिनीटे जरी लेट झाली तरी प्रवाशांचं पुढचं सर्वच गणित बिघडतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Central Railway News
#shorts : Kalyan Train Fire News : रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या एका मालगाडीच्या एक बोगीला भीषण आग!

रेल्वेने (Train) प्रवास करताना अनेक प्रवाशांना स्थानकात उतरल्यावर पुढे दुसरी ट्रेन किंवा बस पकडायची असते. आधीचीच ट्रेन लेट झाली तर पुढच्या ट्रेन किंवा बसच्या वेळा चुकतात. त्यामुळे ५मिनीटे उशिरा आलेल्या ट्रेनमुळे ऑफिसला पोहचालया तब्बल एक तास लागतो. समजा बदलापूरयेथून सकाळी ७ ला सुटणारी लोकल ७.२० आली तर या लोकल ट्रेनमध्ये ७ तसेच त्यानंतर येणाऱ्या ७.१४ आणि ७.३३ च्या व्यक्ती देखील गर्दी करतात.

पुढची ट्रेन सुद्धा उशिरा येईल आणि आणखी उशिर होईल या भीतीने सर्वजण आलेल्या ट्रेनवर तुटून पडतात. यामुळे बरेच जण जीव मुठीत घेत अक्षरशा दरवाजाला लटकून देखील प्रवास करता. या जीवघेण्या प्रवासात ट्रेन नेमकी लेट का होते? हा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आला असेल. बऱ्याच महिला ट्रेन लेट झाल्यावर लोको पायलटला दोष देतात. मात्र ट्रेनला उशिर करणं हे लोको पायलटच्या हातात नसतं.

ऱ्याचवेळा ट्रेनसमोर रुळांवर काही व्यक्ती, किंवा जनावरे येतात त्यावेळी ट्रेन थांबवली जाते. धावत्या ट्रेनमध्येही बऱ्याच विचित्र घटना घडतात काहीवेळा हाणामारी किंवा अन्य विविध कारणांसाठी व्यक्ती ट्रेनती चेन खेचतात. तेव्हा देखील ट्रेन थांबवावी लागते.

अशा परिस्थितीत ट्रेन थांबल्यास पुन्हा सुरू होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे ट्रेन पोहचण्यासाठी उशिर होते. टाईम्स सीटी या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेत चेन खेचण्यच्या घटनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. साल २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये चेन खेचण्याचे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागात चेन खेचण्याच्या २४० घटनांची नोंद झाली होती. आता या वर्षी हा आकडा ३४४ वर पोहचला आहे.

यंदा शुल्लक कारणासाठी चेन खेचल्याने २८० जणांवर गुन्हे दाखल झाले असून १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चेन खेचल्याच्या प्रकरणांमुळे मुंबई विभागातील १२ ट्रेन दररोज उशिराने धावतात. यासह पनवेल - गोरखपूर एक्सप्रेस, एलटीटी - गोरखपूर एक्सप्रेस, सीएसएमटी- हावडा मेल (नागपूर मार्गे), सीएसएमटी - हावडा मेल (मार्गे - अलाहाबाद), एलटीटी स्थानके आणि आंबिवली - टिटवाळा विभाग, सीएसएमटी - लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आणि एलटीटी - गोरखपूर एक्सप्रेस या गाड्या कल्याण, दादर, ठाणे, सीएसएमटी, कसारा, पनवेल या ठिकाणी थांबवल्या जातात.

बऱ्याचवेळा या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चेन खेचल्याने स्थानकात पोहचण्यासा उशिर झाला तर इतर ट्रेनही थांबवून ठेवल्या जातता. त्यामुळे नागरिकांचा आणखी खोळंबा होतो. कारण नसताना किंवा अगदी शुल्लक कारणासाठी १९८९ च्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा दाखल केला जातो. तसेच सदर व्यक्तीला १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो.

Central Railway News
Wardha Crime News: पत्नीने दिली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार, पतीच निघाला चोर, नक्की काय होता पतीचा प्लान?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com