Rohit Aary Encounter Saam Tv
मुंबई/पुणे

Rohit Aary Encounter: एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्यचे व्हॉट्सअप चॅट समोर, मराठी अभिनेत्रींशी संपर्क अन्...

Powai Encounter: पवईमध्ये एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्य प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्यने मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांसोबत संपर्क केला होता. चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम देतो म्हणत भेटायला बोलावले होते.

Priya More

Summary -

  • पवईतील ओलीस प्रकरणात आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर

  • त्याच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप चॅट्स समोर आल्याने नवीन वळण

  • रुचिता जाधव, उर्मिला कानेटकर आणि गिरीश ओक यांच्याशी संपर्काचे पुरावे

  • मराठी सिनेसृष्टीत या प्रकरणामुळे खळबळ उडाली

मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस धरणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. रोहित आर्यबाबत एक धक्क्दायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्यने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि अभिनेत्यांना संपर्क केला होता. त्याचे व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत. अभिनेत्री रूचिता जाधव, उर्मिला कानेटकर आणि गिरीष ओक यांच्याशी त्याने संपर्क केलं असल्याचे सांगितले जात आहे.

पवईमध्ये घडलेल्या ओलिसनाट्याच्या या मोठ्या घटनेनंतर आता रोहित आर्यच्या मोबाईल चॅटमधून एक धक्कादायक माहिती समोर येत असल्याचा दावा केला जात आहे. रिपोर्टनुसार, या डायरेक्टरने रूचिता जाधव या मराठी अभिनेत्रीशी संपर्क केला होता. रूचितालाही जवळपास दोन ते तीन चित्रपट देतो आणि एक वेब सीरिजमध्ये काम देतो असे आमिष दाखवून तिला भेटीसाठी त्याने बोलावले होते. रुचिताने सोशल मीडियावर रोहित आर्यचे व्हॉट्सअप चॅटचे फोटो शेअर करत ही माहिती दिली.

या संपूर्ण प्रकरणात फक्त रुचिताच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांचीही नावे समोर येत आहेत. या दोघांनीही रोहित आर्यच्या स्टुडिओला भेट दिल्याचे म्हटले जात आहे. मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत रोहित आर्यने केलेल्या चॅट्समुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. आता मुंबई पोलिस या दिशेनेही तपास करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT