मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईच्या आपत्कालिन हेल्मपलाइन क्रमांक ११२ वर कॉल करून अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. या कॉलवर त्याने सांगितले की, मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार आहे. हा धमकीचा कॉल येताच मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले आहेत. मुंबई पोलिस हा कॉल कुणी आणि कुठून केला याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, ६ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये गणपती विसर्जनादरम्यान आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. मानवी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला होता. मुंबईच्या वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. ३४ गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून ४०० किलोच्या आरडीएक्सच्या स्फोटाद्वारे मुंबई शहर हादरवून टाकू असे या मेसेजमध्ये लिहिले होते. तसंच, १४ पाकिस्तानी भारतामध्ये घुसल्याचा दावा देखील या मेसेजमध्ये करण्यात आला होता. धमकी देणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मित्राला अडकवण्यासाठी हा फोन केला होता असे तपासातून उघड झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.