News Heat Wave Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Heat Wave: मुंबईत जूनमधील विक्रमी तापमानाची नोंद, 2 दिवसांत नागरिकांना दिलासा मिळणार

Mumbai Weather News: मुंबईत आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

Shivani Tichkule

निवृत्ती बाबर

Mumbai Weather Update: जूनचा पहिला आठवडा सरला असला तरी महाराष्ट्र मान्सूनच्या प्रतीक्षेतच आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक देखील आता पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. मात्र, उन्हाची तीव्रता कमी होताना दिसत नाही.

काल मुंबईत जूनमधील विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी सांताक्रूझ येथे ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मुंबईमध्ये उन्हाचे चटके जाणवत होते. याआधी २०१४ मध्ये ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या (Mumbai) वातावरणात जाणावलेल्या तापमानाचा शनिवारी उच्चांक झाला.आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, शनिवारचे सांताक्रूझचे कमाल तापमान हे जूनमधील मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान होते.

बिपरजॉय चक्रीवादळ शनिवारी आग्नेय ते पश्चिम दिशेच्या मध्ये मुंबईपासून ६०० किलोमीटर अंतरावर होते.या चक्रीवादळाची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळ अशी नोंदली गेली. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शनिवारी दिवसभर वारे वाहत होते. (Mumbai Weather)

मात्र, वाऱ्यांमुळे मुंबईकरांना फारसा दिलासा मिळाला नाही. मुंबईमध्ये उन्हाचे चटके जाणवत होते. मुंबईत आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यावेळी विजाही चमकतील, असा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका कायम

एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन ठेपला असताना, दुसरीकडे  ‘बिपरजॉय’ (Cyclone) चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. येत्या २४ तासांत बिफरजॉय चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्याची शक्यता आहे. याचा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, सध्या बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागाला सतर्कतेचा (Rain Alert)  इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्यामुळे मच्छीमारांनाही खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam: गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? सावली वरुन परबांनी कदमांना घेरलं

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

Devendra Fadnavis: बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही; फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना इशारा

Horrific Accident : वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

SCROLL FOR NEXT