Mumbai Ram Mandir Public Toilet Tragedy News  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत भीषण दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, २ तरुणांचा गुदमरून मृत्यू

Mumbai Ram Mandir Tragedy News : मुंबईतील राम मंदिर पूर्व परिसरात सार्वजनिक शौचालयातून आलेल्या रासायनिक वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. घटनेचा पोलीस व संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईतील राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूची दुर्घटना

  • या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू

  • पुढील पोलीस तपास सुरु

साक्षी यादव, मुंबई

मुंबईतील राम मंदिर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. राम मंदिर (पूर्व) परिसरात सार्वजनिक शौचालयातून बाहेर पडलेल्या रासायनिक वायूमुळे २ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृणालताई ब्रिजजवळ, पारसी पंचायत गेटसमोर असलेल्या सार्वजनिक शौचालयात ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली असून, नेमक्या कोणत्या रसायनामुळे हा प्रकार घडला, याचा तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयातून अचानक तीव्र आणि घाणेरडा रासायनिक वास येत असल्याचे जाणवले. या वासामुळे शौचालयाच्या परिसरात गेलेल्या दोन जणांना गुदमरल्यासारखा त्रास होऊ लागला. प्राथमिक माहितीनुसार, रासायनिक वासाचा परिणाम झाल्याने दोघांची प्रकृती बिघडली.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. BMC अग्निशमन दल, पोलीस, 108 रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. परिसर सुरक्षित करण्यासाठी तसेच संभाव्य रासायनिक धोका तपासण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

दोन्ही तरुणांना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी पहाटे 3.49 वाजता दोघांनाही मृत घोषित केले. मृतांची नावे प्रभाकर धनिवार (24) आणि भाविन देसाई (18) अशी आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमागे नेमके कोणते रसायन कारणीभूत ठरले, सार्वजनिक शौचालयात हे रसायन कसे आले आणि दोन्ही तरुणांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची तपासणी केली जात आहे. पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG e-KYC Deadline: LPG ग्राहकांसाठी शेवटची संधी! ३० सप्टेंबरनंतर बंद होणार हा मोठा फायदा, लगेच करा हे काम

Bigg Boss 20: 'वीकेंड का वार'मध्ये रंगला नवा ड्रामा, काझीमुळे भडकला सलमान खान; 'या' स्पर्धकाची केली चांगलीच कानउघाडणी

'मतचोरी नाही, यांचा मेंदूच चोरीला गेलाय!' फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात; PM मोदींकडे केली अजब मागणी...

Maharashtra News Live Update: साईबाबांच्या चरणी 4 लाख 56 हजारांचा सोन्याचा ब्रोच अर्पण

Tea- Coffee Cups: चहा- कॉफी पिण्यासाठी वापरणारे कप आरोग्यासाठी घातक? ते कधी बदलावेत? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT