Mumbai BKC Rain Updates Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईची तुंबई! मिठी नदी धोक्याच्या पातळीवर, बीकेसीतह पाणीच पाणी; मुंबईकरांची दाणादाण

Mumbai BKC Rain Updates: मुंबई, पुणे, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर. मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; एनडीआरएफची तैनाती. शाळा, कार्यालयांना सुट्टी; वाहतूक ठप्प.

Bhagyashree Kamble

  • मुंबई, पुणे, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर.

  • मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; एनडीआरएफची तैनाती.

  • शाळा, कार्यालयांना सुट्टी; वाहतूक ठप्प.

  • मुंबईत रेड अलर्ट; पुढील ३-४ तासांत अतिवृष्टीचा अंदाज.

गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुणे, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. रेल्वे सेवा ठप्प झाले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याणमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, कुर्लासह बीकेसी परिसरातही पावसानं थैमान घातला आहे. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

मिठी नदी धोक्याच्या पातळीवर

मुंबईत संततधार सुरू झाल्यावर मिठी नदी दुथडी वाहू लागते. कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. जवळपासच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग पाऊस असाच सुरू राहिल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबईला रेड अलर्ट जारी

सोमवारी मुसळधार झालेल्या पावसानंतर मुंबईकरांची मंगळवारची सकाळही पावसासोबत झाली आहे. सध्या मुंबईसह उपनगरांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या अलर्टनुसार, येत्या तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत पहाटेपासून विनाखंड पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळे भायखळा, सायन, दादर, अंधेरी आणि विलेपार्ले यासह अनेक सखल भागांत गुडघाभर पाणी भरलं आहे. विविध ठिकाणातील रस्ते जलमय झाले आहेत. कोसळधारेमुळे अंधेरी सबवे देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

SCROLL FOR NEXT