Powai Lake Overflow Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांना मोठा दिलासा, पवई तलाव तुडुंब भरला, इतर धरणांमधील पाणीसाठा किती? पाहा आकडेवारी!

Mumbai Rainfall Update: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव भरला असून तो ओव्हर फ्लो झाला आहे. या तलावातील पाणी पिण्यासाठी नाही तर मुंबईतील औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते.

Priya More

मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. जोरदार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचले. यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आणि रस्ते वाहतुकिला देखील याचा फटका बसला. तर दुसरीकडे या पावसामुळे मुंबईकरांना आनंदाची बातमी मिळाली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव भरला असून तो ओव्हर फ्लो झाला आहे. पवई तलावामधील पाणी पिण्यासाठी नसले तरी मुंबईतील औद्योगिक कारणांसाठी या पाण्याचा वापर केला जातो.

मुंबई महानगर पालिका क्षेत्रात येणारा पवई तलाव हा कृत्रिम तलावापैकी एक आहे. या तलावातून मुंबईतील औद्योगिक कारणांसाठी पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव आज पहाटे ४.४५ वाजता पूर्णपणे भरून वाहू लागला. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी फक्त औद्योगिक कारणांसाठी वापरले जाते. मुंबई महानगर पालिकेने यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली.

पवई तलावातील पाणी हे फक्त औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसांमध्ये तलाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव भरला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. पण गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा खूपच कमी आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मागच्या महिन्यात पालिकेकडून मुंबईमध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. अजूनही पाणीकपात सुरूच आहे. जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला तरी अद्याप धरण क्षेत्रात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. आतापर्यंत धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ० टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ३५.८५ टक्के पाणीसाठा

- तानसा - ४०.६९ टक्के पाणीसाठा

- मध्य वैतरणा - १९.५१ टक्के पाणीसाठा

- भातसा - १६.१३ टक्के पाणीसाठा

- विहार - ३१.७४ टक्के पाणीसाठा

- तुलसी - ४५.५१ टक्के पाणीसाठा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

SCROLL FOR NEXT