Mumbai News : रोकड घेऊन जाणारी कॅश व्हॅन नाक्यावर थांबवली अन् सापडलं घबाड; निवडणुकीआधी पवई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Crime News : पवई पोलिसांनी मोठी कारवाई करत कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. गार्डन बीट चौकीजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कॅश व्हॅनला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता बारकोड मिस मॅच झाला.
Mumbai News
Mumbai News Saam Digital
Published On

पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. ६ मे रोजी रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कॅश व्हॅनला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता बारकोड मिस मॅच झाला. त्यामुळे पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी व्हॅनसह रोकड जप्त केली असून आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश व्हॅनला आपल्या ताब्यात घेऊन घेतली आहे. रोकड कुठून आली आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करण्यात येत आहे.

Mumbai News
Ambulance Scam: राज्यात 10 हजार कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा? कोर्टानं शिंदे सरकारकडे मागितला खुलासा; काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी निवडणूक अधिकारी, पोलीस यंत्रणा आणि संबंधीत तपास यंत्रणांचा प्रयत्न सुरू आहेत. याआधीही सायन, भांडुप, घाटकोपर, मुंबईत पैशाने भरेलेल्या बॅग सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सायनमध्ये कुरु १.८७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. तर भांडुपमध्ये ३.९३ कोटी आणि घाटकोपरमध्ये ७२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Mumbai News
Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com