MUMBAI RAIN TRAGEDY: 12 DEAD IN 24 HOURS AS TREE COLLAPSE INCIDENTS CONTINUE 
मुंबई/पुणे

Mumbai Rain: मुंबईत 24 तासांत 12 जणांचा मृत्यू , झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच

Mumbai Tree Collapsed : मुंबईची शासकीय यंत्रणा मृत्यूशय्येवर गेली आहे की काय असा प्रश्न पडलाय. गेल्या 24 तासांत 12 मुंबईकरांचा मृत्यू झालाय. मुंबई महापालिकेसह आपत्ती व्यवस्थापन विभागही पूर्णपणे नापास झालाय. या यंत्रणांना कधी जाग येणार? पाहूया यावरचा हा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत खरंच मरण स्वस्त झालंय अशी सामान्य लोकांची स्थिती यंदाच्या पावसाळ्यात झाली आहे. कुठे मॅनहोलमध्ये पडून तर कुठे झाड कोसळून मुंबईकरांचा मृत्यू होतोय. चेंबूरमध्ये झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कुर्ल्यातील नौपाडा परिसरात महापालिका शाळेजवळील एका दुकानावर भलंमोठं झाड कोसळून 63 वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झालाय. गेल्या आठवडाभरातील ही चौथी दुर्घटना आहे. तर मानखुर्दमध्ये घर कोसळून अख्खं कुटुंब संपलय. या वाढत्या दुर्घटनांमुळे मुंबईकरांचा वाली कोण ? असा सवाल निर्माण झालाय. त्यामुळे मुर्दाड बीएमसीच्या ढिसाळ कारभारावरुन संताप व्यक्त होतोय.

मुंबईतल्या दुर्घटनांवर एक नजर टाकूया

मुंबईत मृत्यूसत्र सुरूच

1 जुलै 2026 चेंबूर

स्कूल बसवर झाड कोसळलं, विद्यार्थ्याचा मृत्यू

3 जुलै 2026 सांताक्रुझ

रिलीफ रोडवर झाड कोसळून 8 जण जखमी

4 जुलै 2026 आरे कॉलनी

चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू

5 जुलै 2026 गोरेगाव

एम. जी. रोडवर मोठं झाड कोसळून 2 महिला गंभीर जखमी

5 जुलै 2026 मानखुर्द

3 मजली घर कोसळून 6 दगावले

मुंबईतल्या दुर्घटनांवरुन ठाकरेसेनेने थेट महापौरांना लक्ष्य केलंय. तर झाडांची वेळेत छाटणी न केल्यामुळे आणि मान्सूनपूर्व कामे व्यवस्थित झाली नसल्यानं नागरिकांना जीव गमवावा लागतोय असा आरोप करत मनसेने बीएमसीच्या कारभारावर हल्लाबोल केलाय. खरतर काँक्रीटीकरण झाडांच्या मुळांवर आलंय. हे वास्तव आहे आणि खुद्द महापौरांनीही याची कबुली दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत होतोय देशाचा पहिला ट्रॅव्हलेटरयुक्त पादचारी पूल; मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेला जोडणार, प्रकल्पाचे वैशिष्ट्ये काय?

Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांचं काय करायचं? आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना सांगितली पैशांच्या बचतीची आयडिया

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष, शिवाजी पार्क परिसरात विजयी सभा, Gen Zच्या पाठीशी ठाकरे बंधू

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

SCROLL FOR NEXT