Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला! मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेला फटका; लोकल ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा...

Mumbai Rain News Traffic Local Update: काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १८ जुलै २०२४

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू असून सकल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबईमधील पावसाचा फटका मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. जाणून घ्या लोकलची सद्यस्थिती.

मुंबईत पावसाचा जोर वाढला

आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रेल्वे वाहतूकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने तर मध्य रेल्वे 20 मिनिटं उशिराने धावत आहे. सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसून रेल्वे वाहतूक सुरळित सुरू आहे. फक्त लोकल काही मिनिटे उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. मात्र पावसाचा जोर असाच राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पाणी साचायला सुरुवात...

ठाणे शहरात काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटे पासुन पुन्हा सुरुवात केली आहे. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे अजूनतरी सखल भागात पाणी साचलेले नाही. पण आज दिवसभर रिपरिप सुरूच राहणार आहे. तसेच नवी मुंबईमध्येही पावसाचा जोर कायम असून हिंदू कॉलनी येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT