Mumbai Central Railway Mega block
Mumbai Central Railway Mega block SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो, रविवारी ट्रेनने जायचा प्लान आहे? कधी, कुठंय मेगाब्लॉक? वाचा

Nandkumar Joshi

Mumbai Railway Megablock On Sunday : मुंबईकरांनो, तुम्ही रविवारी ट्रेनने प्रवास करण्याचा प्लान करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक? रविवारचं रेल्वेचे वेळापत्रक कसे असेल? सर्व काही जाणून घ्या या बातमीमधून.

मध्य रेल्वेवर रविवारी, १५ जानेवारी २०२३ रोजी देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत अनेक लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. (Mumbai Railway Mega block)

कधी आणि कुठे असेल मेगाब्लॉक?

माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यांच्यासंबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने निश्चित स्थानकांवर पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येईल. वेळापत्रकानुसार संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल-वाशी अप-डाउन हार्बर मार्गावर...

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत ट्रेन सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ - खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. हे मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT