Pune News : मोठी बातमी! पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पुणे पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे.
Pune News
Pune NewsSaam Tv

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन शुक्रवारी रात्री आला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांकडून संपूर्ण रेल्वे स्टेशनची झडती घेण्यात आली. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची संशयास्पद वस्तू त्या ठिकाणी आढळून आली नाही. या धमकीच्या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

Pune News
Mahableshwar Accident News : महाबळेश्वरातील घाटात 30 कामगारांसह ट्रक दरीत काेसळला

सध्या रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती सामान्य आहे. दरम्यान पुणे (Pune) पोलिसांनी रेल्वे स्टेशनला आलेल्या निनावी फोन संदर्भात तपास सुरू केला आहे. हा फोन कॉल मनमाड (Manmad) परिसरातून करण्यात आला होता अशी माहिती आहे. त्यानंतर आता या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक नाशिकला रवाना झालं आहे.

Pune News
Santokh Singh Chaudhary : भारत जोडो यात्रेत चालताना अचानक खाली कोसळले; काँग्रेस खासदाराचं निधन

काल रात्री अज्ञात इसमाने फोन करून पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच परिसराची पाहणी केली. रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचं प्रवाशांना कळाल्यानंतर प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली. रेल्वे पोलिसांच्या श्वान पथकाने संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या घटनेमुळे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com