मुंबई-पुणे नव्या महामार्गामुळे प्रवास फक्त ९० मिनिटांत शक्य होणार.
अटल सेतूपासून सुरुवात होणारा १३० किमीचा महामार्ग तयार होणार.
पुणे वर्तुळाकार रस्ता आणि बेंगळुरू एक्सप्रेसवे या मार्गाशी जोड.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाढती वाहने लक्षात घेऊन हा निर्णय.
Mumbai to Pune in Just 90 Minutes : मुंबई आणि पुणे ही दोन शहरं आता आणखी जवळ येणार आहेत. त्यासाठी सरकारकडून मास्टरप्लॅन तयार करण्यात आला आहे. नवी मुंबईमधील विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे सध्या असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला समांतर आणखी एक एक्सप्रेस वे बांधण्याचा निर्णय एनएचएआयने (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) घेतला आहे. एक्सप्रेसवे तयार झाल्यास मुंबई आणि पुणे ही दोन शहरं फक्त ९० मिनिटांवर येणार आहेत. (new expressway between Mumbai and Pune to reduce travel time)
मुंबई-पुणे-बंगळूरु हा ८३० किलोमीटरचा एक्सप्रेस वेचे काम वेगात सुरू आहे. याच प्रकल्पांतर्गत मुंबई ते पुणे असा नवा एक्सप्रेसवे बांधला जाईल. अटल सेतू जिथे संपतो तिकडून नवा महामार्ग सुरु होईल आणि पुणे वर्तुळाकर रस्त्याला जोडला जाईल. हा महामार्ग पुढे पुणे-बंगळूरु एक्सप्रेस वेला जोडला जाणार आहे. अटल सेतू-चौक-पुणे, शिवारे असा १३० किमीचा महामार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील ३० किमीच्या आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १०० किमीच्या महामार्गासाठी लवकरच आराखडा तयार केला जाणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई आणि पुणे हे अंतर फक्त ९० मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा ‘एनएचएआय’कडून करण्यात आला आहे. (Mumbai to Pune third expressway plan by NHAI for Mumbai Pune)
पुणे ते बंगळुरू हा ७०० किमीचा एक्सप्रेस वे एनएचआयकडून बांधण्यात येणार आहे. तब्बल ४२ हजार कोटी रूपयांच्या या प्रकल्पाचा आराखडा केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाला सुरूवात होईल. याच महामार्गाचा मुंबईत अटल सेतूपर्यंत १३० किमीचा विस्तार करण्यात येणार आहे. यात पागोटे ते चौक हा ३० किमी आणि चौक ते पुणे वर्तुळाकार रस्ता हा १०० किमी असे दोन टप्पे करण्यात येणार आहेत. अटल सेतू आणि जेएनपीटीला महामार्ग जोडला जाणार आहे, त्यामुळे भविष्यात मुंबईतून फक्त ९० मिनिटात पुण्यात पोहचता येणार आहे. (Atal Setu to Pune circular road connectivity)
नवी मुंबई विमानतळ, तिसरी मुंबई, जेएनपीटी, वाढवण बंदर यामुळे भविष्यात पुणे ते मुंबई यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळेच मुंबई-पुणे यादरम्यान नवीन एक्सप्रेस वे तयार करण्याचा मास्टारप्लॅन तयार करण्यात आला आहे. मुंबई ते पुणे ८३० किमीचा हा महामार्ग तयार होणार आहे. अटल सेतू संपतो तेथून महामार्ग सुरु होईल व पुणे वर्तुळाकर रस्त्याला जोडून पुढे पुणे-बंगळूरु द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे.
२००२ मध्ये मुंबई आणि पुणे ही दोन शहरे फक्त अडीच तासांवर आली. सहा पदरी महामार्गावर ९५ किमीचे अंतर फक्त अडीच तासात पुर्ण होतेय. पण गेल्या काही वर्षांपासून या महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळे हा महामार्ग दहा पदरी करण्याचा निर्णय घेतला असून मिसिंग लिंकचे कामही सुरु आहे. तरीही भविष्यात हा महामार्ग अपुरा पडू शकतो. त्यामुळे पुणे-बंगळुरू या एक्सप्रेसचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येत आहे.
सध्याच्या मुंबई-पुणे महामार्गाला कोणती समस्या भेडसावते आहे?
वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी यामुळे प्रवासाचा वेळ वाढत चालला आहे.
नव्या एक्सप्रेस वेची सुरुवात आणि शेवट कोठे होणार आहे?
अटल सेतूपासून सुरू होऊन पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडला जाईल.
नवीन मुंबई-पुणे एक्सप्रेसवे का तयार केला जात आहे?
नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा एक्सप्रेसवे तयार केला जात आहे.
मुंबई-पुणे हा नवीन एक्सप्रेस वे किती किलोमीटरचा आहे?
एकूण १३० किमीचा असून, ३० किमीचे आराखड्याचे काम पूर्ण झाले आहे.
मुंबई-पुणे-बंगळुरू या रस्ते प्रकल्पाचा खर्च किती आहे?
तब्बल ४२,००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्राकडे आराखडा पाठवला आहे.
नवीन महामार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाला किती वेळ लागणार?
हा नवा एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास फक्त 90 मिनिटांमध्ये होऊ शकतो, असा दावा एनएचएआयने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.