India-Russia Oil Deal: युक्रेन युद्धात रशियाला भारताचे फंडिंग, अमेरिकेचा गंभीर आरोप, १०० टक्के टॅरिफची धमकी

India-Russia oil trade amid Ukraine war : भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेन युद्धासाठी अप्रत्यक्षपणे फंडिंग करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही, तर १०० टक्के टॅरिफ लावण्यात येईल, अशी धमकी दिली आहे.
Why US is threatening 100% tariff on India
Stephen Miller warns India over Russian oil imports; 100% tariff threat sparks tension in global diplomacy.Saam TV News Marathi
Published On
Summary
  • ट्रम्प यांचे सल्लागार स्टीफन मिलर यांचा भारतावर गंभीर आरोप

  • भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, अन्यथा १००% टॅरिफची धमकी

  • भारताने धमकीकडे दुर्लक्ष करून तेल खरेदी सुरूच ठेवली

  • व्यापारी करारात सवलती न दिल्यामुळे अमेरिका भारतावर दबाव आणत आहे

Why US is threatening 100% tariff on India : युक्रेन-रशिया संघर्ष मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. भारताकडून रशियाला फडिंग केले जात असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेने केला आहे. त्याशिवाय भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. अन्यथा १०० टक्के टॅरिफ आकारला जाईल, अशी थेट धमकी मिळाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे विश्वासू सल्लागार स्टीफन मिलर यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. स्टीफन मिलर यांनी भारताविरोधात ट्रम्प यांचे कानही भरल्याची चर्चा आहे.

स्टीफन मिलर यांनी भारतावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, त्यासिवाय रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची धमकी दिली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनसोबतच्या युद्धाचा भडका उडवत आहे. भारताने तात्काळ रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, असे म्हणत मिलर यांनी भारताला १०० टक्के टॅरिफची धमकी दिली आहे.

स्टीफन मिलर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू आहेत. ते व्हाइट हाउसमध्ये डिप्टी चीफ ऑफ स्टाफ म्हणूनही काम कार्यरत आहेत. स्टीफन मिलर म्हणाले की, '' रशियाकडून तेल खरेदी करून युद्धाला फंडिंग करणं खपवून घेतलं जाणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ''

Why US is threatening 100% tariff on India
मंत्रीपद सोडून ५ महिने झाले, पण धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला सोडला नाही

भारताला १०० टक्के टॅरिफची धमकी

रशियाकडून तेल खरेदी करण्यामध्ये भारत आणि चीन एकत्र आहेत, हे पाहून लोक हैराण आहेत, असे स्टीफन मिलर यांनी म्हटले आहे. रॉयटर्सच्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या धमकीनंतर भारताने मॉस्कोमधून तेल खरेदी करणं सुरूच ठेवले आहे. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं नाही तर १०० टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे.

Why US is threatening 100% tariff on India
Vande Bharat Food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवण मोफत मिळते का? वाचा रेल्वेचे नेमके नियम काय

अमेरिकेचा भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न -

भारत आणि अमेरिका यांच्यात अजूनही व्यापारी करार अंतिम झालेला नाही. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये अनेकदा चर्चा झाली आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी भारतावर दबाव वाढवण्यासाठी 25 टक्के शुल्क लावले आहे. त्यांनी 31 जुलै रोजी याची घोषणा केली होती. परंतु हे शुल्क घोषणेनंतर एका आठवड्यापासून लागू होईल. भारत कृषी आणि डेअरी क्षेत्रात सवलती देऊन करारावर स्वाक्षरी करेल असं अमेरिकेला वाटलं होतं, पण भारत यासाठी तयार नाही. यामुळेच दोन्ही देशांमधील व्यापारी कराराचा मुद्दा अडकला आहे. ट्रम्प वारंवार धमक्या देऊन भारतावर दबाव टाकत आहेत.

Why US is threatening 100% tariff on India
Breaking : घराला बॉम्बने उडवून टाकू! मित्राचा फोन घेतला अन् केंद्रीय मंत्र्याला धमकी दिली, नागपुरात खळबळ
Q

भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ म्हणजे काय आणि त्याचा व्यापारावर काय परिणाम होतो?

A

टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर लावले जाणारे कर किंवा शुल्क. भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफमुळे आयात वस्तूंच्या किंमती वाढतात, ज्यामुळे त्या वस्तूंची बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते.

Q

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारातील टॅरिफ-संबंधित चर्चेची सध्याची स्थिती काय आहे?

A

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. 1 ऑगस्ट 2025 च्या डेडलाइनपर्यंत कोणताही करार न झाल्याने अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली.

Q

अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतातील सामान्य लोकांवर काय परिणाम होऊ शकतो?

A

अमेरिकेने भारतावर लावलेल्या 25% टॅरिफमुळे भारतीय वस्तूंची अमेरिकन बाजारातील मागणी कमी होऊ शकते, ज्याचा परिणाम भारतीय निर्यातदार आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com