Mumbai-Pune Missing Link: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Missing Link: मुंबई-पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, मिसिंग लिंकचे काम पूर्ण; कधीपासून होणार सुरू?

Mumbai-Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. या मार्गावर तयार होणाऱ्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच सुरू होणार आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे.

Priya More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-पुणेचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. या मार्गावर तयार होणाऱ्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक या बहुचर्चित प्रकल्पाचा मुहूर्त ठरला आहे. या प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

दरी पुलाचं काम अंतिम टप्प्यात -

मार्च २०२५ पर्यंत मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. या मिसिंग लिंकचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मिसिंग लिंक प्रकल्पातील २ बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. दरी पुलाचं काम १५ टक्के बाकी आहे. हे काम देखील वेगात सुरू आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तयार होणाऱ्या या मिसिंग लिंक प्रकल्पासाठी ६,६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

वर्दीळाच्या रस्त्यांपैकी एक -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा सर्वात जास्त वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंकचे काम करत असताना जरी वाहतुकीवर परिणाम होत नसला तरी देखील कोणताही अडथळ येऊ नये यासाठी काळजीपूर्वक काम केले जात आहे. हा मिसिंग लिंक तयार झाल्यानंतर मुंबईवरून पुण्याला आणि पुण्यावरून मुंबईला सतत आणि रोज प्रवास करणाऱ्यांसाठी चांगला फायदा होईल. त्यांचा प्रवास आणखी वेगवान होईल आणि प्रवासाच्या वेळत बचत होईल.

काय फायदा होईल?

खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्थान) दरम्यानचा हा प्रगत मार्ग आहे. यामुळे सध्याचे अंतर १९ किमीवरून ६ किमीने कमी होऊन १३.३ किमी होईल. यामुळे प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत होईल. त्याचसोबत इंधनाची देखील बचत होईल आणि वायू प्रदूषणही कमी होईल. घाट रस्त्यावर वाहतूक कमी होईल आणि अपघातांचा धोका कमी होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाट येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होतात. याशिवाय पावसाळ्यात भूस्खलनामुळे वाहतूक विस्कळीत होते. हे लक्षात घेऊनच मिसिंग लिंक हा नवीन प्रोजेक्ट तयार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT