Mumbai-Pune Highway Accident : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 28 जण जखमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) पुण्याचा कार्यक्रम संपवून माघारी येत असताना हा अपघात झाला.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास बसमधील 41 प्रवासी गाठ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ ही बस 200 फूट खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिल्याचं दिसून येत आहे. (Latest News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: घटनास्थळी जाणार असल्याची माहिती आहे. घटना वेदनादायी असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल बचाव पथकातील सर्व सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानत त्यांचे कौतुक केले आहे. (Bus Accident)
अपघातील एकूण 13 पैकी 12 मृतांची ओळख पटली आहे. तर एकाची ओखळ पटलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मृतांची नाव
जुई दिपक सावंत (वय 15 वर्ष रा. गोरेगाव)
यश सुभाष यादव (वय 18 वर्ष रा. मुंबई)
स्वप्निल धुमाळ (वय 18 ते 20 रा. मुंबई)
वीर कमलेश मांडवकर (वय 8 रा. गोरेगाव)
वैभवी साबळे (वय 16 वर्ष रा. गोरेगाव)
सतिष धुमाळ (वय 20 रा. गोरेगाव)
मनिष राठोड (वय 23 रा. चेंबर)
हर्षदा परदेशी (वय 19-20 रा. माहिम)
अभय विजय साबळे (वय 20 वर्ष रा. मालाड)
हरीरतन यादव (वय 40 वर्ष रा. जोगेश्वरी)
कृतिक रोहित (गोरेगाव)
राहुल गोठवळ (गोरेगाव)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.