White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Shreya Maskar

पांढरे तूप

पांढरे तूप साधारणपणे पांढुरके किंवा फिकट रंगाचे असते. म्हशीच्या दुधापासून किंवा लोण्यापासून बनवलेल्या तुपाचा रंग अनेकदा फिकट असू शकतो.

White ghee | pinterest

पांढरे तुपाचे फायदे

पांढरे तुपाची चव आणि सुगंध तुलनेने सौम्य असतो. यात शरीराला ऊर्जा देणारे फॅट असते.

Benefits of White Ghee | pinterest

पिवळे तूप

पिवळसर किंवा सोनेरी रंगाचे तूप अनेकदा गायीच्या दुधापासून बनवलेले असते. गायीच्या दुधातील बीटा-कॅरोटीनसारख्या नैसर्गिक रंगद्रव्यांमुळे तुपाला पिवळसर रंग मिळतो.

Yellow ghee | pinterest

पिवळ्या तुपाचे फायदे

पिवळ्या तुपात नैसर्गिक कॅरोटीनॉइड्स असू शकतात. त्याची चव आणि सुगंध तूप बनवण्याच्या पद्धतीनुसार बदलते. यात ऊर्जा आणि चरबीत विरघळणारी जीवनसत्त्वे असतात.

Benefits of Yellow Ghee | pinterest

वजन नियंत्रण

वजन कमी करण्यासाठी गाईचे तूप अधिक चांगले ठरू शकते. ते पचायलाही सोपे असते. तथापि, वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर म्हशीचे तूप हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Weight control | pinterest

हृदयाचे आरोग्य

तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, तर दोन्ही प्रकारचे तूप मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. तुपामध्ये सॅचुरेटेड फॅट असते, ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

Heart health | pinterest

तूप निवडताना कोणती काळजी घ्यावी?

गुणवत्तेसाठी शुद्ध, ताजे आणि योग्य पद्धतीने साठवलेले तूप निवडा. तुपात A, E आणि K यांसारखी चरबीत विरघळणारी जीवनसत्त्वे असतात.

choosing ghee | pinterest

रोज किती तूप खावे?

तुपाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीच्या वय, शारीरिक हालचाल, एकूण आहार आणि आरोग्यस्थितीनुसार बदलते. पोळी किंवा वरण-भातावर तूप घालताना प्रमाण नियंत्रित ठेवा.

ghee to eat daily | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Ghee | yandex

NEXT : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Weight Loss | AI PHOTO
येथे क्लिक करा...