Mumbai-Pune Express Way Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Highway: १८ आणि १९ तारखेला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दीड तास राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Mumbai-Pune Express Way Block: यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर १८ आणि १९ मे २०२४ रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील (Mumbai-Pune Express Highway) पुणे वाहिनीवर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे १८ मे आणि १९ मे रोजी दीड तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याची दखल वाहनचालकांनी घ्यावी आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्या रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर १८ आणि १९ मे २०२४ रोजी गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारच्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. कारण दीड तासांसाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने शेडूंग, खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ येथून पुण्याकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच १९ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करुन द्रुतगती मार्गावरील सर्व वाहने कुसगाव पथकर स्थानकावरुन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक दीड तास बंद राहणार असल्याचे लक्षात घेऊन वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधी दरम्यान एक्स्प्रेस वेवरील वाहन चालकांना अडचण असल्यास त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलिस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

England Playing XI : भारताविरोधात तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, 'धारदार' गोलंदाजाची एन्ट्री

Maharashtra Live News Update : महाडच्या बाजार पेठेत माकडांचा वावर

SCROLL FOR NEXT