ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मऊ, हलका आणि पौष्टिक असा मटार ढोकळा हा झटपट होणारा नाश्ता आहे. हिरव्या मटारामुळे ढोकळ्याला सुंदर रंग आणि छान चव येते.
हिरवे मटार, बेसन, रवा, दही, हिरवी मिरची,आले मीठ, साखर, हळद, इनो आणि कोथींबीर इ. साहित्य लागते.
ताजे मटार घ्या ते स्वच्छ धुवून घ्या. मटार उकडून घ्या.उकडलेले मटार, हिरवी मिरची आणि आले मिक्सरमध्ये वाटून घ्या. या साहित्याची गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या. त्यामुळे ढोकळा मऊ होतो.
एका भांड्यात तयाक केलेली मटार पेस्ट, बेसन, रवा, दही, मीठ, साखर आणि हळद घाला.सगळे साहित्य नीट मिक्स करुन मध्यम घट्ट पीठ तयार करा.
कुकर किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवा. ढोकळा पात्राला आतून तेल लावा जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही.
पीठात शेवटी इनो घालून हलके मिसळा.लगेच ते पात्रात ओता आणि जास्त ढवळू नका.
ढोकळा 15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. सुरी किंवा टूथपिक घालून पाहा. स्वच्छ निघाली तर ढोकळा तयार आहे.
कढईत तेल गरम करून मोहरी, तीळ, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घाला.ही फोडणी ढोकळ्यावर सगळीकडे टाकून चांगला तडका द्या.
गरमागरम मटार ढोकळा हिरवी चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.हा ढोकळा नाश्ता, डबा किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी बेस्ट पर्याय आहे.