ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हा डोसा मिक्सरमध्ये झटपट पीठ करून बनवता येतो. आंबवण्याची गरज नाही. बीटमुळे सुंदर गुलाबी रंग आणि रव्यामुळे कुरकुरीतपणा मिळतो.
रवा (सूजी), मध्यम बीट, दही, मीठ चवीनुसार, पाणी आवश्यकतेनुसार आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
लहान बीट घ्या आणि त्यांना उकडत ठेवा. उकडल्या नंतर थंड झाल्यावर बीट सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्या. बीट सोलून लहान तुकडे करा.
आता मिक्सर मधे बीट, दही, रवा आणि थोडे पाणी टाका. मिक्सर चालू करून हे मिश्रण नीट गुळगुळीत वाटून घ्या. जाडसर राहू देऊ नका. पातळसर, ओघळणारे पीठ तयार करा. हे मिश्रण डोशाला चांगली चव देईल.
आता तयार केलेलं डोशचे पीठ 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. रवा फुगेल आणि डोसा चांगला बनण्यास मदत होईल.
खोबरे, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल, मोहरी आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
नारळ, मिरच्या, मीठ आणि थोडे पाणी मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटून झाल्यानंतर एका भांड्यात चटणी काढा. चटणी काढल्यानंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी द्या आणि ती फोडणी चटणीवर ओता.
तवा गरम करून थोडे तेल लावा. पीठ तव्याच्या कडेला ओतून पसरू द्या. हा डोसा रवा डोशासारखा पातळ बनला जाईल. मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम बिटाचा डोसा नारळ चटणीसोबत सर्व्ह करा. तुम्हाला हवे असल्यास दह्यासोबत ही खाऊ शकता.