ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ, चीजने भरलेले कोथिंबीर चीज बॉल हा चहा किंवा मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट स्नॅक आहे.
बारीक चिरलेली कोथिंबीर, उकडलेले बटाटे, किसलेले चीज, ब्रेडक्रम्ब्स, हिरवी मिरची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, गरम मसाला, कॉर्नफ्लोअर आणि तळण्यासाठी तेल इ. साहित्य लागते.
सर्वात आधी बटाटे उकडून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, मीठ आणि गरम मसाला घालून नीट मिक्स करुन घ्या.
तयार केलेल्या मिश्रणाचे लहान गोळे करुन घ्या. प्रत्येक गोळ्याच्या मध्ये थोडे किसलेले चीज भरून पुन्हा गोल आकार द्या.
एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम्ब्स आणि कॉर्नफ्लोअर घ्या आणि ते दोन्ही मिक्स करा. तयार केलेले चीज बॉल्स या मिश्रणात नीट मिक्स करुन घ्या, जेणेकरून बॉल्स खुसखुशीत होतील.
एक कढई घ्या. त्या कढईत मध्यम आचेवर तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापल्यावर चीज बॉल्स हळूहळू टाका आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
चीज जास्त वितळण्यासाठी बॉल्स 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जर तुम्हाला कमी तेल हवे असेल तर तुम्ही एअर फ्रायरमध्येही बनवू शकता. जास्त खमंगपणासाठी कोथिंबीर चीज बॉल्सवर चाट मसाला टाकू शकता.
गरमागरम कोथिंबीर चीज बॉल्स हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोसोबत सर्व्ह करा.