Mumbai-Pune Expressway traffic congestion: Maharashtra government plans a new Shirur–Karjat highway to ease traffic pressure and save commuters’ time. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी सोडवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन,प्रवाशांचा वाचणार वेळ आणि पैसा

Mumbai-Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. अपघातासारख्या घटनांमुळे कोंडी होतच असते. आता राज्य सरकारने एका मोठ्या पर्यायी मार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतलाय.

Bharat Jadhav

  • मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी ही कायमची समस्या

  • सरकारकडून शिरूर–कर्जत नवा महामार्ग उभारण्याचा प्लॅन

  • मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक एक्सप्रेसवेवर येणार नाही

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामारे जावे लागते. जर या मार्गावर एखादा अपघात झाला तर वाहतूक कोंडी होतेच होते होते. त्यामुळे ही कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकारने एक प्लॅन आखलाय. सरकारने शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत हा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.

मराठवाडा आणि अहिल्यानगरहून मुंबईकडे येणारी बहुतेक वाहने चाकण-तळेगावमार्गे लोणावळ्यातून एक्सप्रेसवेवर येत असतात. यामुळे खंडाळा घाटात वाहनांचा प्रचंड भार वाढतोय. पण जर शिरूर-कर्जत हा नवा मार्ग तयार झाल्यामुळे मराठवाड्यातून येणारी जड वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला पोहोचेल. यामुळे मुंबईला जाण्यासाठी लोणावळा घाटवर न जाता एक स्वतंत्र आणि जलद मार्ग उपलब्ध होईल.

हा रस्ता आधुनिक चारपदरी मल्टिमोडल कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार आहे. या महामार्गाची लांबी १३५ किमी असणार आहे. पहिल्या टप्प्यात ६० किमी आणि दुसऱ्या टप्प्यात ७५ किमीचे काम पूर्ण करण्याचा प्लॅन सरकारने आखलाय. या मार्गावर ५ बोगदे, ६ मोठे पूल आणि ४८ लहान पूल बांधले जाणार आहेत. दरम्यान या प्रकल्पासाठी सुमारे साडेबारा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्गावर 'बीओटी' (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) तत्त्वावर राबवला जाणार आहे.

चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्यातील जड वाहतुकीमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या अंतर्गत रस्त्यांवरील कोंडी देखील कमी होणार आहे. या नव्या मार्गामुळे ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. ६७० हेक्टर जमीन संपादनाचे काम वेगाने पूर्ण करून हा प्रकल्प लवकरच सुरू केला जाईल. तसेच शिरूर-कर्जत महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'डेडलॉक' कायमचा फुटेल, अशी आशा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानचं TCS मधून निलंबन

Sai Tamhankar: बोल्ड बिंदास ब्यूटीफुल सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक, निळ्या साडीत केलं खास फोटोशूट

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

EPFO 3.0: ATM मधून ५ मिनिटांत काढा PFचे पैसे ; कशी असेल प्रोसेस? वाचा संपूर्ण माहिती

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT