Mumbai Pune Missing Link Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वेग मर्यादा किती असणार? या वाहनांना असेल बंदी

Mumbai Pune Express Way: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांचा प्रवास १ मेपासून सुसाट होणार आहे. या दिवशी मिसिंग लिंक सुरू होणार आहे. यावरून कोणत्या वाहनांनी प्रवास करावा आणि वेग मर्यादा किती असावी याबाबत महत्वाची माहिती समोर आली.

Priya More

Summary -

  • मुंबई- पुणे प्रवास सुसाट होणार

  • १ मेपासून मिसिंग लिंक सुरू होणार

  • सुरुवातीला फक्त हलक्या वाहनांना परवानगी

  • मालवाहू आणि धोकादायक वाहनांना बंदी असणार

  • कारसाठी १०० किमी तर बसेससाठी ८० किमी वेग मर्यादा असणार

मुंबई ते पुणे प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. येत्या १ मे रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिसिंग लिंकचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या मिसिंग लिंकबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मिसिंग लिंकवरून कोणती वाहनं प्रवास करू शकतात आणि वाहनांची वेग मर्यादा किती असावी याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

१ मेपासून मिसिंग लिंक होणार सुरू-

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून ही मिसिंग लिंक १ मेपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. मिसिंग लिंक बोगद्यामधील वाहतूक सुरक्षा, तांत्रिक बाबी आणि स्टेकहोल्डर्ससोबत झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक सुरक्षिततेसाठी या मार्गावरील वाहतुकीचे टप्प्याटप्प्याने नियमन केले जाणार आहे. मिसिंग लिंकवरून प्रवास करताना वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी -

मिसिंग लिंकवरून प्रवास करताना पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे १ मे २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत फक्त हलकी वाहने आणि बसेस तसंच प्रवासी वाहने यांना परवानगी असेल. मालवाहू वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे १ नोव्हेंबर २०२६ पासून हलकी मोटार वाहने आणि बसेस तसंच प्रवासी वाहने यांना परवानगी असेल. सुरूवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

ज्वलनशील वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी -

महत्वाचे म्हणजे, मिसिंग लिंकवरून प्रवास करताना धोकादायक माल म्हणजेच ज्वलनशील पदार्थ, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. या सर्व वाहनांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनांची वेग मर्यादा किती असावी?

मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा असणार आहे. हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर बसेस आणि इतर प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मिसिंग लिंकवरून प्रवास करताना निश्चित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा वाहनांची गती ५ टक्क्यांपर्यंत जास्त आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मिसिंग लिंकवरून जाताना वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

खेळता-खेळता लिफ्टमध्ये गेला अन् दोन मजल्यांमध्ये अडकला; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

भारतात आर्थिक संकटाचं वादळ येणार? इंधन दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा

राज्याच्या प्रशासनात 'बदली' वारे! तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

SCROLL FOR NEXT