Workers at the Missing Link project site amid controversy over alleged blood traces on the expressway. saam tv
मुंबई/पुणे

मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट; खोपोली पोलिसात गोहत्या झाल्याची तक्रार

‘Mumbai-Pune Expressway ‘Missing Link : मिसिंग लिंकवरील रक्ताच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. खोपोली पोलीस ठाण्यात गोहत्या झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. मात्र प्रशासन चौकशीला कसं टाळाटाळ करतंय?. तक्रारदाराने साम टीव्हीला काय माहिती दिलीय ? पाहूया यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट.

Snehil Shivaji

  • मिसिंग लिंक प्रकरणात नवा ट्विस्ट

  • रक्ताच्या व्हिडिओमुळे वाद निर्माण

  • गोहत्या झाल्याची तक्रार दाखल

मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ सांडलेल्या रक्ताच्या व्हायरल व्हिडिओची बातमी १ मेला साम टीव्हीनं दाखववल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणानं धक्कादायक वळण घेतलंय. याठिकाणी गो हत्या झाल्याची तक्रार करण्यात आलीय. या तक्रारीचे पुरावेच साम टीव्हीच्या हाती लागले आहेत.

अॅड. योगेश खांडके यांनी २७ मार्चलाच ही तक्रार दाखल केली. त्यानंतर याबाबत पाठपुरावा करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसल्याचा आरोप तक्रारदार खांडकेंनी केलाय. तक्रारदार खांडकेंशी साम टीव्हीनं संवाद साधल्यानंतर त्यांनी आम्हाला काय सांगितलं ते पाहूयात.

ऐकलंत. मात्र आम्ही 1 मेला या प्रकरणी खोपोली पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं ते पाहा. तक्रार दारानं जर 27 मार्चला तक्रार केली होती आणि २८ मार्चला कारवाईची मागणी केली होती तर मग पोलिसांनी या प्रकरणी तक्रारदारानं तक्रार दिली नाही असं का म्हटलं आणि अशी कुठलीच घटना घडली नसल्याचा दावा पोलिसांनी कसा केला.

या तपासात पोलिसांच्या हाती काय लागलं? पोलिस तपासात नेमकं काय समोर आलं याचा खुलासा पोलिसांनी का केला नाही? पोलीस या प्रकरणी कारवाईची टाळाटाळ करत आहेत का? असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT