Mumbai-Pune Express Way Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Express Way: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी होणार, वाहतूक कोंडीतून सुटका; कसा आहे प्लान?

Mumbai-Pune Expressway Expansion: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडींचा प्रश्न सुटणार आहे. एमएसआरडीसीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्य सरकारला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे.

Priya More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास आणखी जलद होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएसआरडीसीने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीने राज्य सरकारला प्रस्तावा पाठवाल आहे. ७५ किलोमीटरचा मार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरी दोन्ही बाजूला एक-एक लेन वाढवण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या या महामार्गावर जाण्या आणि येण्यासाठी प्रत्येक ३ म्हणजेच एकूण ६ मार्गिका आहेत. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीने मोठा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसी हा महामार्ग ८ पदरी करणार आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ त्याचा अंतिम आराखडा तयार करून निविदा मागवल्या जाणार आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ८ पदरी झाल्यावर यामहामार्गावर होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. सकाळ आणि संध्याकाळी होत असलेल्या या वाहतूक कोंडीमुळे प्रवाश्यांचे हाल होते. याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. महामार्ग ८ पदरी झाल्यानंतर वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार ८ पदरी, कसा असेल प्लान? -

- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा सुमारे ९५ किलोमीटर लांबीचा देशातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे.

- ७५ किलोमीटरचा मार्ग ८ पदरी करण्यात येणार आहे.

- १३ किलोमीटरची मिसिंग लिंक देखील ८ मार्गिकांची असणार आहे.

- सध्या जाण्यासाठी ३ आणि येण्यासाठी ३ अशा ६ मार्गिका आहेत.

- जाण्यासाठी आणि येण्यासाठी आणखी एक-एक मार्गिका वाढवण्यात येणार.

-दररोज ५० ते ६० हजार वाहनांचा या मार्गावरून प्रवास

- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्वाचा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT